कार्ड अडकवा, कोरोना पळवा! सॅनिटायझर, हॅन्डवॉशनंतर आता ॲन्टिव्हायरस कार्डची चलती 

anti virus card 1.jpg
anti virus card 1.jpg

कळवण (जि.नाशिक) : कोरोना माहामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या हतबलतेचा कोण कसा फायदा घेईल याची शाश्वती नाही. सध्या अशाच एका ॲन्टिव्हायरसची बाजारात चलती आहे. हे कार्ड गळ्यात घातल्यानंतर विषाणू जवळ येऊ शकत नाही, असा दावा केला जात असल्याने बहुतेकांच्या गळ्यात सध्या हे कार्ड नजरेस पडत आहे. 

कार्ड अडकवा, कोरोना पळवा 
कोरोनाचे संकट जसे वाढत आहे तसे एक नवे कार्ड गळ्यात दिसू लागले आहे. याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, हे ॲन्टिव्हायरस कार्ड गळ्यात घातल्याने कोरोना होत नाही, हे उत्तर कानी पडू लागले आहे. बाजारात कार्डची जोरदार विक्री सुरू असून, त्याची किंमत ५० ते ३०० रुपयांदरम्यान आहे. गर्दीची ठिकाणे टाळा, सोशल डिस्टन्स राखा, मास्क वापरा, कोरोनाची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्या, असे आवाहन एका बाजूला केले असताना ॲन्टिव्हायरस कार्ड गळ्यात घातल्याने एक मीटरच्या आत विषाणू जवळ येत नाही, असा दावा केला जात आहे. 

सॅनिटायझर, हॅन्डवॉशनंतर आता ॲन्टिव्हायरस कार्डची चलती 
एप्रिल- मेमध्ये सॅनिटायझरला अधिक मागणी होती. मूळ औषधांची विक्री कमी होऊन हॅन्डवॉश सॅनिटायझरच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली. आता बहुतांश कार्यालयांत तसेच घरातही सॅनिटायझरच्या बाटल्या आहेत. सॅनिटायझरची क्रेझ कायम असताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन गोळ्यांच्या मागणीत तिप्पट ते चौपट वाढ झाली आहे. ॲन्टिव्हायरस कार्डची बाजारात चलती आहे. पण कोरोनाचे संकट काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. आपल्याला कोरोना होऊ नये, यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. मात्र लोक अमुक एका आजाराला घाबरतात म्हटले, की नव्याने काहीतरी बाजारात आणायचे आणि पैसे कमवायचे असा ट्रेंड सुरू आहे. त्यातूनच हे कार्ड आता अनेकांच्या गळ्यात दिसू लागले आहे.  

संपादन  - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com