तुमचे सहकार्य, आमचा लढा!  कोरोना फायटर्स काय सांगताएत बघा!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कोरोनाविरोधात लढताना समाजात आपल्यातीलच अत्यावश्‍यक सेवेतील डॉक्‍टरांसह पोलिस, घंटागाडी कर्मचारी, वीज कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. त्यांचे काम ते व्यवस्थित हाताळत आहेत. आपण घरात राहून त्यांना सहकार्य करूया. 

नाशिक : कोरोनाविरोधात लढताना समाजात आपल्यातीलच अत्यावश्‍यक सेवेतील डॉक्‍टरांसह पोलिस, घंटागाडी कर्मचारी, वीज कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. त्यांचे काम ते व्यवस्थित हाताळत आहेत. आपण घरात राहून त्यांना सहकार्य करूया. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, बसत आहे
कोरोनाबाबत सोशल मीडिया आणि स्वयंघोषित तज्ज्ञांमुळे विशेषतः मधुमेह झालेल्या व्यक्तींना मोठा धोका आहे, असा समज करून देण्यात आला आहे. काहीअंशी तो खरा असला तरी केवळ मधुमेह नव्हे, तर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने धोका वाढत आहे. नियमित औषधोपचार, पथ्य व्यवस्थित पाळणे, समतोल आहार आणि घरात व्यायाम केला, तर घाबरण्याचे मुळीच कारण नाही. आजार काहीही असला तरी एकदा घसा बघून घ्या, अशी विनंती काही लोक करीत आहेत. हे अगदी अतार्किक आणि मानसिक भीतीचे द्योतक आहे. या काळात डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. आम्ही घरात मुले, पत्नी, आई, वडील असे सर्व नातेवाईक असताना आवश्‍यक ती खबरदारी घेऊन नियमितपणे रुग्ण तपासणी करत आहोत. 24 तास दूरध्वनीवर उपलब्ध आहोत. तुम्ही निर्धास्त राहा. स्वतःची काळजी घ्या. अनावश्‍यक बाहेर फिरणे बंद करा. म्हणजे स्वतःसोबत आपोआप इतरांची काळजी घेतली जाईल. 
- डॉ. विनोद चौधरी, एम. डी. मेडिसीन, मधुमेह आणि हृदयरोगतज्ज्ञ 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती
वीजग्राहकांना 24 तास अखंडितपणे वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी आम्ही आमचे कर्तव्य पार पाडण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहोत. सध्या उन्हाळा आहे. अशा वेळी वीज खंडित होऊ नये; अन्यथा घरातील पंखे बंद होऊन उन्हाचा सामना करावा लागेल. तसेच दूरदर्शनवरील मालिका बघून नागरिक घरी राहणे पसंत करत आहेत. त्यांना करमणुकीचे साधन म्हणून टीव्ही सुरू राहावा, याकरिता वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. "कोरोना फायटर्स' म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडत आहोत, याचे आम्हाला समाधान आहे. - इक्‍बाल पिंजारी, वीज कर्मचारी, सिडको 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 1 व्‍यक्ती, टोपी

हेही वाचा > मालेगावात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह.. २४ तासात ९ कोरोनाबाधित रुग्णांची भर...
नागरिकांना सुरक्षा देणे, समाजकंटकांना ताब्यात घेणे, कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, कारण नसताना दुचाकी व चारचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना दंड करणे, या नियमांचे पालन करून कायद्याचे रक्षण करण्याचे काम करीत आहोत. हे करताना मास्क घालणे, सोशल डिस्टन्स ठेवणे व सॅनिटायझरचा वापर करणे याचीही आम्ही काळजी घेत आहोत. नागरिकांचे आम्हाला सहकार्य लाभत आहे. काही बोटावर मोजण्याइतके लोक उपद्रवी असतात. त्यांचाही आम्ही कायद्याला अधिन राहून समाचार घेतो. अत्यावश्‍यक सेवा- सुविधांसाठी नागरिकांनाही सहकार्य करतो. या सर्व बाबी करत असताना आपण "कोरोना फायटर्स' म्हणून भूमिका बजावत असल्याचे समाधान मिळते. - प्रशांत नागरे, पोलिस कर्मचारी, अंबड पोलिस ठाणे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal against Corona to essential service personnel