एक-दोन नाही, चक्क तीन बिबट्यांची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अंबादास शिंदे
Wednesday, 7 October 2020

डोबी मळ्यात सात-आठ वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. त्र्यंबकनाथ बुवा आणि प्रमोद बुवा यांच्या शेतात बिबट्यांचा वावर आहे. डोबी मळ्यातील लोकांचा व्यवसाय शेती आहे. मळ्याशेजारी आर्टिलरी सेंटर हद्दीत मोठे जंगल आहे. शेजारी वालदेवी नदी आहे. त्यामुळे ससे, मोर, डुक्कर आदी प्राणी आहेत. या प्राण्यांची शिकार करण्यासाठी बिबटे येतात व येथेच मुक्काम ठोकतात.

नाशिक रोड : देवळालीगाव येथील रोकडोबावाडीजवळील डोबी मळ्यात तीन बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

डोबी मळ्यात तीन बिबट्यांचे दर्शन 
डोबी मळ्यात सात-आठ वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. त्र्यंबकनाथ बुवा आणि प्रमोद बुवा यांच्या शेतात बिबट्यांचा वावर आहे. डोबी मळ्यातील लोकांचा व्यवसाय शेती आहे. मळ्याशेजारी आर्टिलरी सेंटर हद्दीत मोठे जंगल आहे. शेजारी वालदेवी नदी आहे. त्यामुळे ससे, मोर, डुक्कर आदी प्राणी आहेत. या प्राण्यांची शिकार करण्यासाठी बिबटे येतात व येथेच मुक्काम ठोकतात. आतापर्यंत सात बिबटे पकडण्यात आले आहेत. आठवा बिबट्या जयभवानी रोडवरील मनोहर गार्डनमध्ये पकडण्यात आला होता. डोबी मळ्यात सध्या खुरपणी, निंदणी आदी कामांसाठी विळ्याबरोबरच कुऱ्हाडी घेऊनच शेतकरी व मजुरांना जावे लागते, अशी माहिती गोरख बुवा, निवृत्ती बुवा यांनी दिली. सध्या डोबी मळ्यात बिबट्याची मादी आणि दोन बच्चे आहेत. हे बच्चे साधारण दोन वर्षांचे आहेत. येथील पथदीप बंद आहेत. ते महापालिकेने तातडीने सुरू करावेत, तसेच वन विभागाने पिंजरा लावावा, असे निवृत्ती बुवा यांनी सांगितले.  

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appearance of three leopards nashik marathi news