आदिवासी विकास आयुक्तपदी हिरालाल सोनवणे यांची नियुक्ती

महेंद्र महाजन
Saturday, 19 September 2020

सुमारे १६ हजार ५०० वनराई बंधारे बांधून त्यांनी जिल्ह्यातील धान व तांदूळ शेतीचे नुकसान झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविला. जिल्हा परिषद कर्मचारी व लोकसहभागातून सरकारचा निधी खर्च न करता हे काम श्री. सोनवणे यांनी केले आहे.  

नाशिक : येथील आदिवासी विकास आयुक्तपदी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची नियुक्ती झाली. दरम्यान, आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांची बदली करण्यात आली असली, तरीही त्यांना पदभार देण्यात आलेला नाही. 

डॉ. किरण कुलकर्णी यांची बदली 

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ‘अनलॉक लर्निंग’ ही कार्यपद्धती डॉ. कुलकर्णी यांनी तयार केली. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त नाशिकमधून झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी या उपक्रमाची घोषणा केली. तसेच रेडिओद्वारे औपचारिक शिक्षणाचा उपक्रम डॉ. कुलकर्णी यांनी राबविला. आदिवासी विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षक आणि गावातील शिक्षित तरुणांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था ‘अनलॉक लर्निंग’द्वारे करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर देण्यात आला होता. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

राज्यपालांच्या हस्ते गौरव 

श्री. सोनवणे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांनी यापूर्वी नंदुरबार व शिरपूर येथे प्रांताधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी १२ ते १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले सुमारे तीन हजार ५०० दावे निकाली काढले. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर कार्यरत असताना श्री. सोनवणे यांनी पंतप्रधान घरकुल योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. सुमारे १६ हजार ५०० वनराई बंधारे बांधून त्यांनी जिल्ह्यातील धान व तांदूळ शेतीचे नुकसान झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविला. जिल्हा परिषद कर्मचारी व लोकसहभागातून सरकारचा निधी खर्च न करता हे काम श्री. सोनवणे यांनी केले आहे.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Hiralal Sonawane as Tribal Development Commissioner nashik marathi news