लॉकडाउनमध्ये देशी-विदेशी मद्याच्या दुकानांना टाळे लागल्यावर "त्यांनी' लढविली 'अशी' शक्कल..अन् मग....

drink-n-drive.jpg
drink-n-drive.jpg

नाशिक / सटाणा : शहरातील हॉटेल गोविंदममागे एका वाहनातून अवैध दारूची विक्री करणाऱ्या युवकाविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी युवकाकडून 27 हजारांची दारू आणि वाहन असे मिळून दोन लाख 27 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान, लॉकडाउनमध्ये देशी-विदेशी मद्याच्या दुकानांना टाळे असल्याने बागलाण तालुक्‍यात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. सटाणा पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांना दणका दिला असून, दोन दिवसांत पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. 

असा घडला प्रकार
सोमवारी (ता. 6) रात्री अकराच्या सुमारास शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल गोविंदममागील बाजूस एका वाहनातून अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. कार (एमएच 41, व्ही 2445)मधून अवैध दारू विक्री करीत असताना मिलिंद निकम (वय 38, रा. चौगाव, ता. बागलाण) याला मुद्देमालासह पकडले. पोलिसांनी वाहन आणि मुद्देमाल ताब्यात घेतला व मिलिंद निकम याच्याविरोधात दारूबंदीविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com