भाजपा खासदार म्हणाल्या, ''अर्णब गोस्वामींची अटक निव्वळ राज्य सरकारची सुडभावना''

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णव गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आले होते.

नाशिक : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी पनवेल पोलिसांनी अटक केली ही अटक झाल्याचे समोर येताच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी गोस्वामी यांना केलेली ही अटक निव्वळ सुडभावना असून राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर केलेली टिका आणि गैरप्रकारांना उजेडात आणल्यानेच पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असे मत भाजप खासदार डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.

यानिमित्ताने लोकशाहीचा चौथ्या स्तंभावर हल्ला झाल्याने त्याचा सर्व घटकांतून राज्य शासनाचा निषेध होत आहे. भारतीय जनता पक्ष या विषयावर स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही खासदार डॉ. भारती पवार यांनी दिला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे आज येथील गोल्फ क्‍लब मैदानावर राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

काय आहे प्रकरण?

मे 2018 रोजी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णव गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आले होते. सुसाईड नोटमध्ये पत्रकार गोस्वामी यांचे नाव असल्याने,  या प्रकरणात आज सकाळी पनवेल पोलिसांनी अटक केली होती. त्याचा भारताीय भारतीय जनता पक्षाने आणिबाणीची आठवण करुन देणारी घटना आहे, अशी टिका करीत राज्यभर राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. गोल्फ क्‍लब मैदानावर झालेल्या आंदोलनात खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, आमदार सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, सुनील केदार, पवन भगूरकर, देवदत्त जोशी यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेतला.    

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या

 राज्य सरकारपुढे अनेक प्रश्‍न आहेत. कोरोनासारख्या समस्येने राज्यातील जनात ग्रस्त आहे. विकासकामे रेंगाळली आहेत. त्याबाबत कोणतेही ठोस काम करण्यात सरकारला यश आलेले नाही. नागिरकांत त्याची नाराजी आहे. त्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाय करीत आहेत. पत्रकार अर्णब गोस्वामींची अटक त्याचाच भाग आहे. मात्र त्यातून काहीही साध्य होणार नाही. सरकारने सुडभावना सोडावी आणि जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे असे मत खासदार पवार यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arresting Arnab Goswami is a deliberate act says bjp nashik marathi news