नाशिकच्या हरहुन्नरी कलावंताचा विजेच्या धक्क्याने मृत्यू 

pratik jadhav.jpg
pratik jadhav.jpg

नाशिक : शिंदे-पळसे येथील प्रतीक विजय जाधव (वय १९) याचा बुधवारी (ता. ८) विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शहरातील नाट्यक्षेत्रात हरहुन्नरी कलावंत म्हणून तो सर्वांना परिचित होता. घरचा शेतीव्यवसाय सांभाळून त्याने नाट्यक्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता.

हरहुन्नरी कलावंत प्रतीक जाधव याचा मृत्यू 

नाशिक शिक्षणप्रसारक मंडळाच्या शाळेत शिक्षण घेत असतानाच त्याने अभिनयाचे धडे गिरवायला सुरवात केली. पुरुषोत्तक करंडक एकांकिका स्पर्धेत त्याने अनेकदा पारितोषिके मिळविली. ‘डॉल्बी वाजलंय की धडधडतंय', ‘पाऊसपाड्या’ यांसारख्या नाटकांत त्याने अभिनय केला. ‘माँ’ या बालनाट्याचे त्याने दिग्दर्शन तसेच प्रकाशयोजना केली होती. राज्य बालनाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ‘मी पुन्हा येईन’ या नाटकाचे त्याने नेपथ्य केले होते. अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी कोणतीही कामे करण्यात तो नेहमी तयार असायचा. ऐन उमेदीच्या काळात त्याचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कोरोनामुळे त्याचे अंत्यदर्शनही घेता न आल्याची खंत नाट्यक्षेत्रातील त्याच्या सहकाऱ्यांनी बोलून दाखवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com