इगतपुरीच्या निसर्ग सौंदर्याची चित्रपट सृष्टीला भुरळ; कावनईत चित्रीकरण सुरु, पाहा PHOTOS

विजय पगारे
Saturday, 3 October 2020

जुन्या नव्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या तालुक्यात झाले आहे. हिंदी व  मराठी अनेक चित्रपटात या तालुक्याच्या निसर्गाचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे शासनानेही या तालुक्यात चित्रनगरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच खाजगी चित्रनगरीही उभारली जात असल्याची चर्चा आहे.

नाशिक : (इगतपुरी) निसर्गाची खाण, पर्यटनाचा केंद्रबिंदू व निसर्गाची अद्भुत किमया असा त्रिवेणी संगम असलेल्या इगतपुरीसारख्या निसर्गरम्य तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिका व चित्रपटांचे शूटिंग होत आहेत. चित्रनगरीला अत्यंत पोषक व अनुकूल नैसर्गिक स्थिती असलेल्या या तालुक्याची अनेक कलावंत, निर्माता व दिग्दर्शकांना भुरळ पडत आहे. 

खाजगी चित्रनगरीही येथे उभारली जात असल्याची चर्चा

प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट असला तरी आईवडिलांच्या प्रेमाला प्राधान्य देण्याला मात्र या चित्रपटात प्राधान्य दिले आहे. इगतपुरी तालुकाच असा निसर्गरम्य आहे की या तालुक्याच्या निसर्गावर कोण प्रेम करत नाही? जुन्या नव्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या तालुक्यात झाले आहे. हिंदी व  मराठी अनेक चित्रपटात या तालुक्याच्या निसर्गाचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे शासनानेही या तालुक्यात चित्रनगरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच खाजगी चित्रनगरीही उभारली जात असल्याची चर्चा आहे.
त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपूर्वी चित्रपटासाठी लोकेशन न्याहाळत असताना शासनाचा दादासाहेब फाळके पुरस्कार लाभलेल्या "बाजार" चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांना या निसर्गरम्य इगतपुरी तालुक्याचे आकर्षण झाले. आपल्या नियोजित नियोजित मराठी चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण इगतपुरी तालुक्यात करण्याचा इरादा त्यांनी पक्का केला होता. त्याच अनुषंगाने व चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसापासून कावनई परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

हेही वाचा > लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी लोकेशन घेतले. अनेक लोकेशन नजरेत भरले मात्र इगतपुरी तालुक्यातील लोकेशन पाहता येथील निसर्गातून एक वेगळा आनंद व अनुभव घेता आला.इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण पाहिल्यानंतर महाबळेश्वर व पाचगनीचाही विसर पडावा असा येथील निसर्ग मनाला भावला. - योगेश भोसले, प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artists, producers and directors are fascinated by the natural beauty of Igatpuri nashik marathi news