"तू माझ्या बायकोला शिवीगाळ का केली" 'त्याचा' थेट मानेवरच वार..त्यानंतर..

attack from argument.jpg
attack from argument.jpg

नाशिक : गोरेवाडीतील सावळीराम परिसरात सराईत गुंडांनी एकावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता.1) घडली. याप्रकरणी तिघांविरोधात नाशिक रोड पोलिसांत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

असा घडला प्रकार..
हुसेन शेख, गणेश ऊर्फ छकुल्या वाघमारे, गोविंद साबळे (सर्व रा. सिन्नर फाटा, नाशिक रोड) अशी संशयितांची नावे आहेत. हल्ल्यात जखमी सचिन चव्हाण यांच्या पत्नी शुभांगी सचिन चव्हाण (रा. सावळीरामनगर, गायकवाड मळा, गोरेवाडी, नाशिक रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 29 डिसेंबरला दुपारी चारच्या सुमारास सचिन चव्हाण व शेजारी राहणाऱ्या सानिया इम्रान शेख यांचा बकरीवरून वाद होऊन भांडण झाले होते. याप्रकरणी सानिया शेख यांनी नाशिक रोड पोलिसांत तक्रारही केली होती. त्यानंतर हे प्रकरण सानिया यांचे पती इम्रान शेख व सचिन चव्हाण यांच्यात मिटविण्यात आले होते. मात्र, सानिया शेख यांचा नातलग व परिसरातील सराईत गुन्हेगार संशयित हुसेन शेख याला मिटविण्यात आलेला वाद रुचला नाही. त्यामुळे तो वाद झाल्यापासून सचिन चव्हाण यांच्यावर लक्ष ठेवून होता.

वादाची कुरापत काढून, "तू सानियाला शिवीगाळ का केली"

संशयिताची दहशत असल्याने सचिन चव्हाण त्यांच्या कुटुंबीयांसह मंगळवारी (ता.31) मध्यरात्री शुभांगी यांच्या बहिणीच्या घराकडे झोपण्यासाठी जात होते. त्या वेळी पाठीमागून दुचाकीवरून तिघे संशयित आले आणि हुसेन शेख याने त्याच वादाची कुरापत काढून, तू सानियाला शिवीगाळ का केली, असे म्हणून त्याच्याकडील कोयता काढून हनुवटीवर वार केला. तर दुसरा संशयित छकुल्या यानेही त्याच्याकडील कोयता काढून मानेवर वार केला. संशयित साबळे याने सचिन चव्हाण याला धरून ठेवले होते. शुभांगी यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता, आसपास नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करणारे मदतीला धावण्याऐवजी घटना पाहून पळून गेले. सचिन चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने संशयितांनी पळ काढला. घटनेची माहिती कळताच शुभांगी याचा भाऊ विशाल हांडोरे पोचला. त्यानंतर उपचारासाठी सचिन यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com