लग्नाला नाही म्हणताच त्याने 'तिला' गालावर..गळ्यावर..पाठीवर...

woman attack.jpg
woman attack.jpg

नाशिक : पंचवटीतील राजपाल कॉलनीमध्ये 26 नोव्हेंबर 2016 ला रात्री नऊच्या सुमारास पीडित महिला तिच्या घराकडे जात असताना आरोपी सोळसे याने म्हशीच्या गोठ्यासमोर रोखत लग्नाची मागणी घातली. त्यास पीडितेने नकार देताच सोळसेने पीडितेच्या गालावर, गळ्यावर, पाठीवर चाकूने वार करून ठार करण्याचा प्रयत्न केला.

असा घडला प्रकार...

 पंचवटीतील राजपाल कॉलनीमध्ये 26 नोव्हेंबर 2016 ला रात्री नऊच्या सुमारास पीडित महिला तिच्या घराकडे जात असताना आरोपी सोळसे याने म्हशीच्या गोठ्यासमोर रोखत लग्नाची मागणी घातली. त्यास पीडितेने नकार देताच सोळसेने पीडितेच्या गालावर, गळ्यावर, पाठीवर चाकूने वार करून ठार करण्याचा प्रयत्न केला. लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून महिलेवर चाकूने वार करून ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नितीन लक्ष्मण सोळसे (रा. गोंदेगाव, ता. कोपरगाव, जि. नगर) असे आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक पी. बी. मुंढे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 

जिल्हा न्यायालयाचा निकाल; पंचवटीतील घटना 

जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांच्यासमोर खटला चालला. ऍड. शिरीष कडवे यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहत साक्षीदार तपासले. आरोपी सोळसे याच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्यायाधीश वाघवसे यांनी त्यास चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सहाय्यक उपनिरीक्षक पी. व्ही. शिंदे, एस. एल. जगताप, एस. यू. गोसावी यांनी पैरवी अधिकारी म्हणून पाठपुरावा केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com