थरारक! "तू नाही आली तर करेन आत्महत्या" सांगत विवाहित पुरुषाने अंगावर ओतले पेट्रोल ...अनैतिक प्रेमसंबंधातून घडला प्रकार 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 19 June 2020

सुनील थोरात याचे जवळपास दहा वर्षांपूर्वी कंपनीमध्ये कामाला असताना कंपनीतच कामाला असलेल्या एका 45 वर्षीय विधवा विवाहितेसोबत अनैतिक प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधांची माहिती थोरात याच्या पत्नीला समजल्याने तिने त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर.... 

नाशिक / म्हसरूळ : सुनील थोरात याचे जवळपास दहा वर्षांपूर्वी कंपनीमध्ये कामाला असताना कंपनीतच कामाला असलेल्या एका 45 वर्षीय विधवा विवाहितेसोबत अनैतिक प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधांची माहिती थोरात याच्या पत्नीला समजल्याने तिने त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर.... 

..अन् अंगावर ओतले पेट्राेल

काळाराम मंदिरासमोरील शुक्रवार (ता. 19) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उद्यानाच्या जवळ सातपूर येथील एका पुरुषाने पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला. आजूबाजूच्या नागरिकांनी या पुरुषाला लागलेली आग विझवित पोलिसांना कळविले. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. 

काय घडले असे की ओतले अंगावर पेट्रोल
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सातपूर येथील अशोक नगर परिसरात राहणाऱ्या 47 वर्षीय सुनील थोरात याचे जवळपास दहा वर्षांपूर्वी कंपनीमध्ये कामाला असताना कंपनीतच कामाला असलेल्या एका 45 वर्षीय विधवा विवाहितेसोबत अनैतिक प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधांची माहिती थोरात याच्या पत्नीला समजल्याने तिने त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर अनैतिक संबंध असलेल्या या दोघांमध्ये कायम भांडण होत असल्याने या महिलेने काही दिवसांपूर्वी अशोक नगर येथील घर सोडून पंचवटी परिसरातील कुमावत नगर येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास आली होती. सुनील थोरात याने शुक्रवारी (ता.19) सकाळी या महिलेला फोन करून माझा रेनकोट तुझ्याकडे आहे तो देण्यासाठी काळाराम मंदिराजवळ येण्यास सांगितले . हि महिला रेनकोट घेऊन आली असता थोरात याने तू आत्ताच्या आता माझ्यासोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेल अशी धमकी दिली . महिलेने माझ्या मुलीचे लग्न झाल्याशिवाय मला येणे शक्य नसल्याचे सांगताच सुनील याने आपल्यासोबत बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून लायटरच्या साहाय्याने पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा ओरडण्याचा आवाज एकूण परिसरातील नागरिक जमा होऊन त्याच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

महिलेचाही हात जळाला

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत जळालेल्या सुनील याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले . यावेळी सुनील यांच्याकडे असलेल्या पिशवीत विषारी औषधाची बाटली पोलिसांना मिळून आली आहे. या घटनेत महिलेचा देखील हात जळाला असून तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to commit suicide by pouring petrol on a man nashik maratrgi