काळवीट धडपडत चालल्याचे पाहून बळावला संशय;  जवळ जाऊन पाहताच ग्रामस्थांना धक्का!

Kalwit
Kalwit

नाशिक / नगरसूल : सोमवारी (ता. १०) सायंकाळी एक काळवीट धडपडत चालत असल्याचे व त्याच वेळी एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार त्या ठिकाणाहून जोरात निघून गेल्याचे या भागातून जात असलेल्या एका पाव विक्रेत्याने बघितले. त्याने हा प्रकार रेंडाळे येथे येऊन ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर...

काळवीट धडपडत चालल्याचे पाहून बळावला संशय;  

सोमवारी (ता. १०) सायंकाळी एक काळवीट धडपडत चालत असल्याचे व त्याच वेळी एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार त्या ठिकाणाहून जोरात निघून गेल्याचे या भागातून जात असलेल्या एका पाव विक्रेत्याने बघितले. त्याने हा प्रकार रेंडाळे येथे येऊन ग्रामस्थांना सांगितला. त्यानुसार गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन काळविटाची पाहणी केली असता, त्याच्या खांद्यावर बारीक छिद्र असून, त्यातून रक्तस्राव सुरू होता. हे छिद्र आरपार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अंतर जास्त असल्यामुळे संबंधित इंडिका कारचा नंबर पाहता आला नसल्याचे पाव विक्रेत्याने सांगितले. या घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी काळविटास ग्रामस्थांच्या सहाय्याने उपचारासाठी येवला येथे नेले.

२००९ मध्ये हरणाच्या शिकारीची घटना उघडकीस आली

रेंडाळे (ता. येवला) शिवारात ममदापूर-रेंडाळे रस्त्यालगत काळविटाची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. या प्रयत्नात संबंधित काळवीट जखमी झाले असून, त्याला ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी येवला येथे नेण्यात आले आहे. दरम्यान, याच परिसरात २००९ मध्ये हरणाच्या शिकारीची घटना उघडकीस आली होती. तेव्हा मालेगावच्या शिकाऱ्यास रंगेहाथ पकडले गेले होते. त्यानंतरही अनेक वेळा शिकारीचा प्रयत्न झाल्याचे येथील रहिवासी सांगतात.


आजच्या घटनेत काळविटाच्या मानेवर गोल छिद्र आढळले आहे. त्यावरून काळविटाची शिकार करण्याचा पुन्हा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होते. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या परिसरातील हरीण, काळविटांंची सुरक्षितता रामभरोसेच आहे.- प्रवीण आहेर, अध्यक्ष, वन्यजीव समिती, रेंडाळे

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

काळविटाच्या मानेवर सूज आली आहे. त्यामुळे घटनेचा उलगडा होत नाही. येवला येथे काळवीट नेण्यात आले. तपासणीनंतर खरा प्रकार कळेल. आम्ही घटना घडलेल्या परिसरात गस्त घालत आहोत.- मोहन पवार, वनपाल, राजापूर वन विभाग

(संपादन : ब्रिजकुमार परिहार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com