मावशीच निघाली वैरीण..! गर्भवती भाचीसोबत केले धक्कादायक कृत्य..आईने दिलेल्या फिर्यादीत खुलासा

pregnent 123.jpg
pregnent 123.jpg

नाशिक / येवला : आईने आपल्या सख्ख्या बहिणाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नवऱ्यासोबत घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर विवाहिता मुलगी बहिणीकडे दोन ते अडीच महिने राहिली. त्यावेळी मावशीने भाचीसोबत असे काही कृत्य केले. ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला

असा घडला प्रकार... आईने दिलेल्या फिर्यादीत खुलासा

पिंपळगाव जलाल येथील संगीताबाई सखाहरी भोरकडे यांनी चांदवड तालुक्यातील निमोण येथे राहणारी आपली बहीण अहिल्याबाई विष्णू काळे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. संगीताबाईंची विवाहिता मुलगी डिसेंबर २०१९ मध्ये तिच्या नवऱ्यासोबत घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर ती  बहीण अहिल्याबाई काळे हिच्याकडे निमोण येथे दोन ते अडीच महिने राहिली. मात्र त्यानंतर तिला तिच्या मुलाची आठवण येऊ लागल्याने ती पुन्हा सासरी गेली. तेथे सासरकडील लोकांना मुलगी गर्भवती असल्याची शंका आल्याने सासरकडील लोकांनी तपासणी केली असता ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे समजले. त्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी मुलीला माहेरी पाठवले.आणि मग..

मावशीच निघाली वैरीण..!

त्यावेळी आरोपी मावशी अहिल्याबाई काळे हिने पिंपळगाव जलाल येथे येऊन १३ जुलै रोजी विवाहिता मुलगी ज्या बाजेवर झोपलेली होती. त्याठिकाणी जाऊन माझ्या पोराचे नाव का घेतले? अशी विचारणा करीत तिला बाजेवरून खाली जोराचा धक्का देत पाडल्याने मुलीच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती बेशुद्ध होऊन उपचारादरम्यान मृत पावली. शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मनमाड पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवे,पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळाची भेट देत पाहणी केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहे.निमोण (ता.चांदवड) येथील बहिणेने पिंपळगाव जलाल येथील बहिणीच्या घरी येऊन १३ जुलै रोजी बहिणीच्या विवाहित मुलीचा खून केल्याची फिर्याद विवाहित मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

रिपोर्ट - संतोष विंचू 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com