जागेच्या व्यवहारात घातला चांगलाच गंडा...चक्क 93 लाखांची फसवणूक

fraud check.jpg
fraud check.jpg

नाशिक रोड : करारनाम्याप्रमाणे जागेची खरेदी न करता व्यवहारातील 93 लाख 50 हजार रुपये परत न करता खोटे बोलून फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

काय घडले नेमके?

बलविंदरसिंग परमजितसिंग लांबा (वय 49, रा. गुरुद्वारामागे, नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, बलविंदरसिंग हे भाऊ सुखविंदरसिंग, जसप्रितसिंग, गुरुप्रितसिंग, बलविंदरसिंग, तसेच तुषार अरोरा, विशाल अरोरा हे एकत्रित गुंतवणूक करतात. 2016 मध्ये बलविंदरसिंग यांचे परिचित इलेक्‍ट्रिक कान्ट्रॅक्‍टर अभिषेक त्रिवेदी व कीर्ती त्रिवेदी (म्हसोबा मंदिरमागे, नाशिक रोड), वसंत पाटील (वास्को हाटेलमागे, नाशिक रोड) यांना बलविंदरसिंग व त्यांच्या भागिदारांनी 92 लाख 36 हजार रुपये व्यवसायासाठी दिले होते.ही रक्कम त्यांनी परत केली नाही. त्याबदल्यात अभिषेक व कीर्ती त्रिवेदी यांच्या मालकीची अनुराधा थिएटरमागील विजय लक्ष्मी चेंबर्स हाउसिंग सोसायटीतील तळघरातील 27 हजार 574 चौरसमीटर जागा 93 लाख 50 हजाराला बलविंदरसिंग व भागिदारांच्या नावे करून देण्याचा व्यवहार झाला होता.

वारंवार खोटे बोलून फसवणूक

9 जानेवारी 2018 ला त्रिवेदी यांनी ही जागा नोटरीद्वारे करारनामा करून दिला होता. त्यात त्यांनी ती जागा सहा महिन्यांत खरेदी करून उरलेली एक लाख 14 हजारांची रक्कम खरेदी करताना देऊ, असे कबूल केले होते. परंतु आजपर्यंत जागा खरेदी करून दिलेली नाही. तसेच या बेसमेन्टवर कर्ज काढल्याचेही समजले. नोटरी करारनाम्याप्रमाणे जागेची खरेदी न करता तसेच पैसे परत न करता वारंवार खोटे बोलून फसवणूक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com