कोरोनापासून संरक्षण हेच "त्यांचे' ध्येय! वडनेर भैरवमध्ये सालाडे बाबा ट्रस्टकडून दिला जातोय मदतीचा हात!

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 एप्रिल 2020

वडनेर भैरव गाव हे चांदवड तालुक्यातील सर्वात मोठे गाव. या गावात ग्रामपंचायतचे उपसरपंच रावसाहेब भालेराव व ग्रामविकास अधिकारी रोषण सूर्यवंशी यांच्या आवाहनास मदत म्हणून व सामाजिक उपक्रम म्हणून वडनेर भैरव येथे बाराशे लिटर पाणीयुक्त कीटकनाशक फवारणी मंडळाचे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे यांच्या ट्रक्टरच्या साहाय्याने केली.

नाशिक / चांदवड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सालाडे बाबा कला क्रीडा मंडळाच्या वतीने वडनेर भैरव या गावात जनजागृतीसाठी विविध उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी म्हणून योगदान देण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आवाहन केल्याप्रमाणे वडनेर भैरव, पिंपळनारे, धोंड्गव्हानवाडी, बहादुरी या गावांत कोरोना विषाणू पासून सावध रहा, घरात रहा कोरोना टाळा.असे आवाहन करणारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सालाडे बाबा कला क्रीडा मंडळ ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम
 
वडनेर भैरव गाव हे चांदवड तालुक्यातील सर्वात मोठे गाव. या गावात ग्रामपंचायतचे उपसरपंच रावसाहेब भालेराव व ग्रामविकास अधिकारी रोषण सूर्यवंशी यांच्या आवाहनास मदत म्हणून व सामाजिक उपक्रम म्हणून वडनेर भैरव येथे बाराशे लिटर पाणीयुक्त कीटकनाशक फवारणी ही मंडळाचे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे यांच्या ट्रक्टरच्या साहाय्याने केली. वडनेर भैरव पोलिसांचे कार्यक्षेत्र हे अर्धा तालुका आहे. त्या ४४ गावातील पोलीस पाटील व ग्रामस्थ यांना पोलिसांनी केलेलं आवाहन मंडळाने व्हिडिओ बनवून गांवा गावात जनजागृती करण्यात येत आहे. वडनेर भैरव पोलीस हे आरोग्य दृष्ट्या कार्यक्षम रहावे व कोरोना पासून त्यांचा बचाव होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे यांनी वडनेर पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर भेट म्हणून दिले.

Image may contain: 3 people, outdoor

काळभैरव यात्रा व उपासनेची माहिती प्रसारित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडनेर भैरवची कालभैरवनाथ यात्रा जिल्हाधिकारी यांनी यात्रा बंद केली. हि यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, यासाठी विविध जिल्ह्यातून भाविक येतात. त्यांना यात्रेबाबत सविस्तरपणे माहिती माहितीपट बनवून ग्राम जोशी दीपक गुरु यांच्या ,माध्य्मातून काळभैरव यात्रा व उपासना घरीच राहून कशी करता येईल याची माहिती महाराष्ट्रभर प्रसारित केली. या उपक्रमाचे स्वागत भैरवनाथ ट्रस्ट चे योगेश साळुंके, सचिव बाळासाहेब वाघ यांनी स्वागतच केले.

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

सद्या विध्यार्थ्यांना कोरोनामुळे सक्तीने घरी सुट्टी मिळाली. हा काळ परीक्षेचा असून त्यांचा अभ्यास व मनोरंजन व्हावे,जनजागृती व्हावी म्हणून ट्रस्ट जिल्हा पातळी वर इयता १ ते ४ ,इयत्ता ५ ते ८ .आणि ९ ते १२ वी पर्यंत कोरोना आणि समाज या विषयावर निबंध, स्पर्धा आयोजित केली यात त्यांनी घरी राहूनच हे चित्र इमेल च्या साह्याने ट्रस्ट ला पाठवायचे आहे.हा उपक्रम राबविला यास जिल्ह्यातून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

Image may contain: 3 people, outdoor

गरजूंना जेवण

वडनेर मध्ये काही गरजू लोकांंना सलग १० दिवसापासून जेवण देण्याचा उपक्रम सालाडे बाबा ट्रस्टने राबविला आहे, तसेच मुख्यमंत्री निधीसाठी ५००० हजार रु व पंतप्रधान निधी साठी ५००० रु. देण्यात आले. आपली सामाजिकता जोपासली. असे अनेक उपक्रम या काळात ट्रस्टने राबविले आहे.

Image may contain: 2 people, people standing and outdoor

हेही वाचा > CoronaFighter : VIDEO : "मनात भीती असते..पण कोरोनाच्या सावटाखाली सेवेचे झाड फुलवायचंय" कर्तव्यसाठी 'त्या' अनेकांच्या केअरटेकर!

सुंदर रथाची प्रतिकृती

वडनेर भैरवचा रथ उत्सव हा जिल्हाभर प्रसिद्ध आहे. वडनेर भैरव येथील शेतकरी रंगनाथ माधवराव वाटपाडे यांनी अतिशय सुंदर रथाची प्रतिकृती बनवून या यात्रेतील सर्व विधी व उपक्रम घरीच पार पाडले ट्रस्ट ने यासर्व कार्य्क्रामची माहिती घेऊन पूर्ण महराष्ट्रात हि माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठविली त्यामुळे भाविकांना घर बसल्या देवदर्शन झाले.

हेही वाचा > VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness about Corona by the Salade Baba Trust in Wadner Bhairav