PHOTOS : नाशिककरांच्या फुफ्फुसात रोज तीन सिगारेटची धुराडी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

वाढत्या वायुप्रदूषणाची गंभीरता लक्षात घेऊन "झटका डॉट ओआरजी' यांच्यातर्फे जनजागृती मोहीम सुरू आहे. वायुप्रदूषणात भर घालणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांवर कठोर कारवाईसह अन्य विविध मागण्यांकरिता सर्वसामान्यांचे पाठबळ मिळविले जात आहे.

नाशिक : शुद्ध शहर म्हणून जगभर ओळख असलेले नाशिक शहर वायुप्रदूषणाबाबत दिल्ली, मुंबई, पुणे शहराच्या रांगेत जाऊन बसले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार नाशिक शहरातील प्रत्येक नागरिक दिवसाला आपल्या फुफ्फुसात रोज तीन सिगारेटची धुराडी पचवत असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण तीन नव्हे तर पाचपर्यंत जात असल्याची स्थिती आहे. 

क्‍यूआर कोड स्कॅन करत मोहिमेला बळ 

वाढत्या वायुप्रदूषणाची गंभीरता लक्षात घेऊन "झटका डॉट ओआरजी' यांच्यातर्फे जनजागृती मोहीम सुरू आहे. वायुप्रदूषणात भर घालणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांवर कठोर कारवाईसह अन्य विविध मागण्यांकरिता सर्वसामान्यांचे पाठबळ मिळविले जात आहे. याअंतर्गत क्‍यूआर कोड स्कॅन करत मोहिमेला बळ देण्याचे आवाहन सध्या शहरात सुरू आहे. 

एअर क्‍वालिटी मॉनिटरिंग स्टेशन

सोमवारी (ता. 3) सकाळी साडेसातला कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर स्वयंसेवकांतर्फे या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाकडे तक्रार दाखल केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता. 3) दुपारपर्यंत सुमारे 230 व्यक्‍तींनी मोहिमेला पाठबळ दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्धारित नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी. सातपूर वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रा (एअर क्‍वालिटी मॉनिटरिंग स्टेशन)ची 29 ऑक्‍टोबरनंतरची माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी अशा प्रमुख मागण्या आहेत.

Image may contain: 1 person, outdoor

नागरिकांना सावधानतेचा इशारा 

कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांमध्ये धूम्रपानाच्या धोक्‍यांविषयी जागरूकता निर्माण केली. या वेळी मोठी सिगारेट साकारली होती. याद्वारे संभाव्य धोके विशद केले. धूम्रपान करणाऱ्या व्यक्‍तीमुळे इतरांना होणाऱ्या त्रासाबाबतही माहिती दिली. उपक्रमात रोशन केदार, प्रतीक जाधव, रोहित केदार, वैभव शर्मा यांनी सहभाग नोंदविला. 

हेही वाचा > world cancer day : कर्करोगात 'या' कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक! 

Image may contain: one or more people and people standing

श्‍वसनाच्या आजारांचा विळखा 

नोव्हेंबर 2019 पासून शहरातील हवा वेगाने प्रदूषित होण्यास सुरवात झाली आहे. 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राच्या आकड्यांनुसार नाशिकच्या हवेतील दर्जा सलग 12 दिवस दीडशेपेक्षा अधिक असल्याने ही धोक्‍याची घंटा आहे. शहरातील नागरिकांना शहर व परिसरात खेळती हवा असल्याने त्याची तीव्रता सध्या जाणवत नाही. मात्र, शरीरात नित्याने जाणारे प्रदूषणाचे अतिसूक्ष्म कण हे सुदृढ शरीर खिळखिळे करण्याकडे वाटचाल करीत असल्याने वेळीच उपाययोजना करणे आवश्‍यक असल्याचे झटका डॉट कॉमचे रोशन केदार यांनी सांगितले.  

Image may contain: 1 person

हेही वाचा > नाशिककरांनो,..नाशिक राहण्यायोग्य आहे का?..केंद्र सरकार विचारतंय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness about smoking by Jatka dot org nashik marathi news