कुख्यात गुंडावरच उलटला डाव! डीजीपी नगरला गोळीबारात सराईत गुन्हेगार ठार

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Sunday, 20 September 2020

सिन्नर फाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्यावर शनिवारी (ता. 19) रात्री पावणेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोर हे देखील सराईत गुन्हेगार असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत.

नाशिक : (नासिक रोड) सिन्नर फाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख याच्यावर शनिवारी (ता. 19) रात्री पावणेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोर हे देखील सराईत गुन्हेगार असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत.

अशी आहे घटना

डीजीपी नगर येथील साई मंदिराजवळ शनिवारी (ता. 19) रात्री पावणेदहाच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार असणारा बाबा शेख (रा. सिन्नर फाटा) याच्यावर मुर्गी राजा आणि टीप्या या सराईत गुन्हेगारांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने गावठी कट्टाने पाठीत गोळी मारली. यात कुख्यात गुन्हेगार बाबा शेख जखमी झाला. या अवस्थेत त्याने फोन करून नासिक रोड येथील आपल्या नातेवाईकाला माहिती देऊन बोलावून घेतले. नातेवाईक आल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. बाबा शेखला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गोळी मारल्यानंतर बाबा शेखने नातेवाईकांना हल्लेखोरांची नावे सांगितलेली असून उपनगरचे पथक आणि गुन्हे शाखेची विविध पथके हल्लेखोरांच्या शोधार्थ रवाना झालेली आहेत. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

घटना समजताच पोलिस उपायुक्त विजय खरात तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पहाटे पाच वाजेपर्यंत घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू होता. संशयित लवकरच सापडतील असा विश्वास उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी व्यक्त केला आहे. हल्ला झालेला गुन्हेगार हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर एनपीडीए, तडीपारीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Sheikh, a criminal from Nashik Road, was shot dead nashik marathi news