नात्याला काळिमा फासणारी घटना...प्रॉपर्टीसाठी छोटा भाऊ गेला खालच्या थराला

sugarcane farm.jpg
sugarcane farm.jpg

नाशिक : देशात कोरोनाने थैमान घातला आहे. अशातच लॉकडाऊनमुळे गुन्ह्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशीच एक नात्याला काळिमा फासणारी घटना कसबे-सुकेणे येथे घडली आहे

दारूची बाटली फोडून हल्ला

कसबे सुकेणे येथील दारूच्या नशेत असलेल्या छोट्या भावाने आईच्या नावे असलेली शेतजमीन विकू देत नसल्याचा रागातून मोठ्या भावासह वहिनी आणि पुतण्यावर दारूची बाटली फोडून हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. 16) रात्री अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

असा घडला प्रकार
ज्ञानेश्‍वर विश्‍वनाथ जाधव (वय 55) यांच्याकडे त्यांचा लहान भाऊ संशयित आरोपी निवृत्ती जाधव याने आईच्या नावावरील शेतजमीन विकण्याचा तगादा लावला होता. मात्र फिर्यादी आईची जमीन विकू देत नसल्याने आरोपी निवृत्तीने शनिवारी रात्री अकराला दारूच्या नशेत फिर्यादी ज्ञानेश्‍वर जाधव अंगणामध्ये झोपले असताना त्यांना शिवीगाळ सुरू केली. त्या वेळी ज्ञानेश्‍वर यांची पत्नी सुनंदा जाधव (45) शिवीगाळ का करतो, अशी विचारणा करत असतानाच निवृत्तीने शेजारीच असलेली दारूची बाटली फोडून सुनंदा यांच्या गालावर गंभीर वार केला. फिर्यादी ज्ञानेश्‍वर पत्नीस सोडवायला गेले असता त्यांच्यावरही आरोपीने वार करून डाव्या बगलेवर गंभीर जखम केली.

तसेच पुतण्या सोडवायला आला असता आरोपीने त्याच्याही उजव्या पोटरीचा चावा घेतला. हा सर्व प्रकार कसबे सुकेणे येथील पोस्ट ऑफिसजवळ त्यांच्या घराच्या मोकळ्या जागेत घडला. फिर्यादी व त्याची पत्नी गंभीर जखमी असून, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com