धक्कादायक..कोरोना हॉटस्पॉटवरून अंत्यदर्शनासाठी नातेवाईक आल्याचा संशय...समर्थकांनी केला 'हा' प्रकार 

funeral due to corona.jpg
funeral due to corona.jpg

नाशिक / सातपूर : मृताचे नातेवाईक पुणे, मुंबई व मालेगावहून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, असे परिसरातील नागरिकांनी गायकवाड यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण गायकवाड यांनी उपस्थित महिलांसोबत केला धक्कादायक प्रकार...

घडला असा प्रकार

स्वारबाबानगर येथील वंचित आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा ऊर्मिला गायकवाड यांच्या एका जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने अंत्यदर्शनासाठी पुणे, मुंबई व मालेगावचे नातेवाईक आल्याच्या संशयावरून लोंढे समर्थकांनी विरोध करत मारहाण केल्याचा आरोप गायकवाड समर्थकांनी केला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण गायकवाड यांनी शिवीगाळ करत महिलांना मारहाण केली, असा आरोप लोंढे समर्थकांनी केला. सातपूर पोलिसांत एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

शिवीगाळ करत महिलांना मारहाण

लोकसभा निवडणुकीपासून आरपीआयचे लोंढे व वंचित आघाडीचे गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये वाद आहे. स्वारबाबानगर येथे राहत असलेल्या वंचितच्या महिला जिल्हाध्यक्षा ऊर्मिला गायकवाड यांच्या जवळच्या नातेवाइकाचे बुधवारी (ता. 20) निधन झाल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. मृताचे नातेवाईक पुणे, मुंबई व मालेगावहून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, असे परिसरातील नागरिकांनी गायकवाड यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण गायकवाड यांनी शिवीगाळ करत महिलांना मारहाण केली. तसेच या प्रकरणात आरपीआयचे प्रकाश लोंढे व त्यांच्या परिवाराचा काही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत काही महिलांनी सातपूर पोलिसांत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तणावाचे वातावरण निर्माण

गायकवाड यांना लोंढे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण करण्याचा आरोप करत लोंढेंसह इतरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. स्वारबाबानगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. सातपूर पोलिसांनी अधिकचा बंदोबस्त वाढवत दोन्ही गटांच्या प्रमुखांना ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात येत असल्याचे सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com