''आम्हाला सांगणारा तू लागून कोण गेला!''...असं म्हणत त्यांनी चक्क

beating to police.jpg
beating to police.jpg

नाशिक : पंचवटीतील हिरावाडीत सुरू असलेल्या हाणामाऱ्या सोडविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच धक्काबुक्की झाल्याने याप्रकरणी 9 जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी आहे घटना

पोलिस कर्मचारी संदीप घुगे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित राहुल बाबाजी पाटील (28), केतन अशोक थोरात (25), विशाल नाना वाघ (18), संदीप सिंग शिखोने (32), सुरज माधव खोडे, कपिल रमेश वानखेडे, प्रतिक भाऊसाहेब पठारे (29), अमित रमेश लहामगे (28), पवनदीप अमरसिंग संधू या संशयितांमध्ये सोमवारी (ता.24) गोकुळधाम सोसायटी च्या पार्किंगमध्ये दारु पिऊन त्यांच्यात हाणामाऱ्या सुरू होत्या. त्यावेळी गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी संदीप घुगे यांनी सदरचा वाद मिटविण्यासाठी गेले. त्यांना उगाच वाद घालू नका, आपापल्या घरी जा असे नीट समजवले. परंतू प्रमाणाबाहेर मद्यप्राशन केलेल्या संशयितांनी आधी धक्काबुक्की केली व नंतर शिवीगाळ करत पोलिस कर्मचारी संदीप घुगे यांना मारहाण केली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक एस.जी. पवार हे तपास करीत आहेत. 

दिवसेंदिवस तरुणांमध्ये असे असभ्यवृत्तीचे प्रमाण वाढले असून त्यावर आळा घालणे गरजेचे आहे. याकडे पालकांनी व तसेच, स्वत: तरुणांनी आपली वागणूक सुधारणे आवश्यक आहे. संबंधित प्रकरणाचा पंचवटी पोलीस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com