आहारात ज्वारीची भाकरी खात नसाल..तर हे नक्की वाचा

jwari bhakri.jpg
jwari bhakri.jpg

नाशिक : दररोजच्या आहारातून जे वेगवेगळे अन्नघटक आपल्या पोटात जातात त्याद्वारे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. शरीराचं पोषण करणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांची माहिती आपल्याला असायला हवी. मुख्यत्वे आपल्या जेवणात चपाती, पुरी, पराठा किंवा नान यांचा समावेश असतो. पण त्यापेक्षाही जास्त सकस आणि पोषक असलेल्या ज्वारीचा मात्र आहार म्हणून फार कमी वापर केला जातो. डायट प्लॅनमध्ये तर ती नावालासुद्धा नसते. म्हणूनच शहरी भागात ज्वारीची मागणी कमी झाली आहे. पण ग्रामीण भागात राहणारे लोकं आजही मुख्य अन्न म्हणून ज्वारीलाच प्राधान्य देतात. कदाचित त्यामुळेच शहरातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातील्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी असतात.

का खावी ज्वारीची भाकरी

-ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.

-ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.

-बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

-ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

-ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

-ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

-भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

-ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते. ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

-ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

-हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

-शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

-महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

-शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

-काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

-ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com