आईच निघाली उलट्या काळजाची..शेवटी मुलाने संतापात..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

गेल्या 16 जानेवारीला हा खून झाला होता. पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी या प्रकरणी समांतर तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अनैतिक संबंध, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची शक्‍यता बळावली. सागरने रवी अहिरेच्या सांगण्यावरून रवी व संजय पावरा यांच्याकडील गावठी कट्टा आणून दिला. गावठी कट्टा व गोळ्यांसाठी 25 हजार रुपये देण्यात आले.

नाशिक : (मालेगाव) संविधाननगर, भायगाव शिवारातील ज्योती डोंगरे (वय 36) या महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला नऊ दिवसांनंतर यश आले. संबंधित महिलेच्या जाचाला कंटाळून तिचा सावत्र मुलगा मनोज डोंगरे (वय 28, रा. संकल्पनगर) यानेच सुपारी देऊन मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी मनोजसह सात जणांना अटक केली. 

अशी घडली घटना

ज्योतीचा सावत्र मुलगा मनोज व शिक्षक पती भटू डोंगरे यांना तिचे अनैतिक संबंध असल्याचे माहीत होते, तसेच तिची पतीची मालमत्ता व पगारावर नजर होती.
नाशिकला फ्लॅट घेण्यासाठी 30 लाख रुपयांची मागणी करून ती पतीला त्रास देत होती. या सर्वांचा मनोजला राग आला होता. त्यामुळे त्याने प्रकाश निकम ऊर्फ पका (34, साने गुरुजीनगर), जितेंद्र कास ऊर्फ जितू राजपूत (40, मुक्ताई कॉलनी), रवींद्र अहिरे (27, इंदिरानगर, चंदनपुरी), रवी पावरा (30, धुळे), सरदार पावरा (40, रा. आंबे, ता. शिरपूर) व सागर रंगारी (27, मोतीबाग नाका) या मित्रांच्या मदतीने खुनाचा कट रचला. जितू व प्रकाश यांनी स्कॉर्पिओने संविधाननगर परिसरात शाळेजवळ गाडी उभी करून गोळ्या झाडून खून केला. भिंतीवरून उड्या टाकून दोघे फरारी झाले.

खुनासाठी तीन लाखांची सुपारी 

सागरने रवी अहिरेच्या सांगण्यावरून रवी व संजय पावरा यांच्याकडील गावठी कट्टा आणून दिला. गावठी कट्टा व गोळ्यांसाठी 25 हजार रुपये देण्यात आले. खुनासाठी तीन लाखांची सुपारी देण्यात आली होती. यातील रवी व सागर हे पोलिसपुत्र आहेत. पोलिस निरीक्षक पाटील, सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी, संदीप दुनगहू, जमादार सुनील अहिरे, हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले, पोलिस नाईक राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, हरीश आव्हाड, रतिलाल वाघ, फिरोज पठाण, प्रदीप बहिरम, संदीप लगड आदींच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. 

हेही वाचा> जिल्हा परिषदेचा वादग्रस्त कारभार : 'तुकडा गॅंग' ला मूकसंमती...

Image may contain: one or more people, people sitting and shoes

वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात खून व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

संशयितांमध्ये दोघा पोलिसपुत्रांचा समावेश आहे. गेल्या 16 जानेवारीला हा खून झाला होता. पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी या प्रकरणी समांतर तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अनैतिक संबंध, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची शक्‍यता बळावली. या प्रकरणी वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात खून व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.  
हेही वाचा> रेल्वेस्थानकावर जोडीने फिरतोय 'तो'..जरा जपून!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaygaon's female murder case nashik marathi news