भूषण कासलीवाल यांचा राजीनामा मंजूर; नगरसेवकांकडून घटनाक्रमाचा खुलासा

भाऊसाहेब गोसावी
Friday, 16 October 2020

चांदवड नगरपरिषद उपनगराध्यक्ष यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष रेखा गवळी यांनी बोलावलेल्या विशेष बैठकीत पुर्वसंध्येला दिलेला राजीनामा गवळी यांनी बैठकीत नगरसेवकांसमोर ठेवल्यानंतर मंजूर करण्यात आला.

चांदवड(जि.नाशिक)  - चांदवड नगरपरिषद उपनगराध्यक्ष यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष रेखा गवळी यांनी बोलावलेल्या विशेष बैठकीत पुर्वसंध्येला दिलेला राजीनामा गवळी यांनी बैठकीत नगरसेवकांसमोर ठेवल्यानंतर मंजूर करण्यात आला.

अविश्वास प्रस्त्वावाच्या पाठी 'नो पॉलिटिक्स !' 

या बैठकीनंतर उपस्थित सर्वच नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनाक्रमाचा खुलासा केला. यावेळी शिवसेनेचे गटनेते जगन्नाथ राऊत यांनी खुलासा करताना सांगितले की. या अविश्वास प्रस्त्वावाच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. एकोणसाठ महिन्याच्या कार्यकाळात आम्ही सर्वच नगरसेवकांनी भूषण कासलीवाल यांना सहकार्य केले आहे.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

चांदवडचा विकास डोळ्यासमोर निर्णय

मात्र या काळात आम्ही सहकार्य केल्यानंतरही आम्ही मागितलेली माहिती आम्हाला समाधानकारकपणे मिळाली नाही.अनेक विकासकामांचे बाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. याबद्दल नगरसेवकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून फक्त चांदवड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्यावर अविश्वास दाखल केला होता.असे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhushan Kasliwal's resignation approved chandwad nashik marathi news