चिंताजनक! भीतीमुळे गर्भधारणा टाळली..नाशिक शहरात पाच महिन्यांत मुलींचा जन्मदर घटला..

baby abort.jpg
baby abort.jpg

नाशिक : कोरोनाचा धोका गर्भवती माता व बाळाला होण्याची शक्यता असल्याच्या चर्चेने गर्भधारणा टाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे विवाह पुढे ढकलले आहेत. ५० लोकांमध्ये विवाह झाले. कोरोनात जोखीम नको, म्हणून गर्भधारणा टाळली गेल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.​

विवाह लांबल्याने पुढील वर्षी जन्मदर अधिक

कोरोना विषाणूने संपूर्ण जग कवेत घेतल्यानंतर त्याचा परिणाम जन्मदरावर होण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी तीन महिन्यांचा अहवाल तपासला असता, जन्मदर सरासरी राहिला आहे. शहरात जानेवारी ते मेदरम्यान चार हजार ७४७ मुली, तर पाच हजार १३१ मुलांचा जन्म झाला. मुलांच्या जन्माच्या प्रमाणात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण घटले. लॉकडाउनमुळे अनेकांचे विवाह पुढे ढकलले. पुढील काळात जन्मदराचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, गर्भवतींना अधिक धोका असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे अनेक गर्भवतींना ग्रासले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जन्मदर घटतो की काय, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, महापालिकेच्या आकडेवारीवरून जन्मदराचे प्रमाण मार्च महिन्यात सरासरीइतके आहे.

भीतीमुळे गर्भधारणा टाळली
कोरोनाचा धोका गर्भवती माता व बाळाला होण्याची शक्यता असल्याच्या चर्चेने गर्भधारणा टाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे विवाह पुढे ढकलले आहेत. ५० लोकांमध्ये विवाह झाले. कोरोनात जोखीम नको, म्हणून गर्भधारणा टाळली गेल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जन्मदरात अचानक वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गर्भातील बाळाला कोरोनाची लागण होते, याला कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गर्भात बाळाला नाळेद्वारे (डिफेन्स मॅकेनिझम) शुद्ध रक्तपुरवठा होत असल्याने कोरोनाचा संबंध येत नसल्याचे डॉक्टर सांगतात.

कोरोनाकाळातील जन्मदर
मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. या काळात शहरात ८५० मुली, तर ९८० मुलांचा जन्म झाला. एप्रिलमध्ये ८२७ मुली, तर ८११ मुले जन्माला आली. मेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला असताना, एक हजार ७६ मुली, तर एक हजार १४२ मुलांचा जन्म झाला.

त्या चर्चेला शास्त्रीय आधार नाही

गर्भपिशवीत नाळीतून बाळाला शुद्ध रक्तपुरवठा होतो. त्यामुळे कोरोनाचा संबंध येत नाही. गर्भधारणा झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने मातेला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. सध्या गर्भधारणा टाळण्यामागे अनामिक भीती कारणीभूत आहे. गर्भातील बाळाला कोरोना होत असल्याच्या चर्चेला शास्त्रीय आधार नाही.- डॉ. प्रदीप पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ

कोरोनामुळे जन्मदरात अजिबात घट झालेली नाही. नैसर्गिक प्रसूती नियमितपणे होत आहे. नैसर्गिकरित्या प्रसूती होत नाही. अशा केसेसमध्ये गर्भधारणा पुढे ढकलण्यात येताना दिसत आहेत. यासंदर्भात डॉक्टरसुद्धा जोखीम घेण्यास तयार नाही.-डॉ. प्रशांत चौधरी, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com