VIDEO : भाजपाच्या आमदार म्हणतात, "उपवास करा..कोरोनाला पळवून लावा"

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 6 April 2020

देशभरात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याविरोधात सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस, डॉक्‍टर्स, नर्स अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांना अनेक अडचणी येतात. अनेकदा त्यांना देखील जेवायला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा त्याग लक्षात घेऊन त्याच्या सन्मानार्थ आपण एक दिवसाचा उपवास करावा.

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या चाळीसाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, त्यागाचा सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज उपवास करणार आहेत. कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण देखील सर्वांनी उपवास करावा असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

त्यांचा त्याग लक्षात घेऊन एक दिवसाचा उपवास करावा
यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. त्यात त्या म्हणतात, "आज भारतीय जनता पक्षाचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काल प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला दुरध्वनी केला. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सांगितला. देशभरात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याविरोधात सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस, डॉक्‍टर्स, नर्स अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांना अनेक अडचणी येतात. अनेकदा त्यांना देखील जेवायला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा त्याग लक्षात घेऊन त्याच्या सन्मानार्थ आपण एक दिवसाचा उपवास करावा, अशा सुचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत.

त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मला सुचना केल्या. प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ज्या ज्याला शक्‍य असेल त्याने उपवास करावा. त्यानुसार मी आज उपवास करीत आहे. आपणही उपवास करावा असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA devyani pharande appeals for do Fast and escape Corona