दिवसरात्र मेहनत..आव्हाने केली पार...दिव्यांग कृपाने मारली बाजी..!

मनीष कुलकर्णी | Saturday, 1 August 2020

दिवसरात्र मेहनत घेत आईच्या सहकार्याने तिने यश संपादन केले. प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याचे तिचे स्वप्न आहे. स्वतःच्या समोर असलेली आव्हाने पार करत दिव्यांग कृपा परदेशी नाशिकच्या सारडा कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

नाशिक : कला क्षेत्रात कल्‍पकतेने नावलौकिक मिळविलेल्‍या दृष्टिबाधित कृपा परदेशी हिने ९३.२० टक्‍के गुण मिळवून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. दिवसरात्र मेहनत घेत आईच्या सहकार्याने तिने यश संपादन केले. प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याचे तिचे स्वप्न आहे.

दृष्टिहीन कृपा नाशिकमध्ये पहिली..! 

स्वतःच्या समोर असलेली आव्हाने पार करत दिव्यांग कृपा परदेशी सारडा कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ब्रेल लिपीतील पुस्तके जवळपास सहा महिने उपलब्ध नसतानाही तिने हे यश संपादन केले. ९० टक्क्यांपुढेच गुण मिळवायचे ध्येय ठेवून तिने अभ्यास केला. कृपा परदेशी उत्कृष्ट गायिका व सर्व प्रकारची वाद्ये वाजविण्यात तिला हातखंडा आहे. तिला यावर चार विशेष प्रावीण्य मिळाले आहे. येत्या काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेत भरती व्हायचे आहे. 
 

हेही वाचा > क्रूर नियती! पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोरच संजय सोबत घडत होती भयानक घटना..पण ते होते लाचार

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - ज्योती देवरे