photos : लॉकडाउनमध्येही नाशिककर जपताहेत सामाजिक भान; रोज शंभर जणांकडून 'रक्‍तदान'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळतोय. नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. त्यामुळे शहरात रक्‍तदान शिबिरांचे प्रमाणही घटले आहे. दुसरीकडे विविध शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्‍ताची आवश्‍यकता मात्र थांबलेली नाही. अशा परिस्थितीतही नाशिककरांकडून संवेदनशीलतेचे दर्शन घडत आहे. अनेक नागरिक स्वत: रक्‍तपेढ्यांशी संपर्क साधून रक्‍तदानासंदर्भात विचारणा करीत आहेत.

नाशिक : "रक्‍तदान हेच श्रेष्ठ दान' असे म्हटले जाते; परंतु सध्या लॉकडाउनमुळे रक्‍तसंकलन प्रक्रियादेखील प्रभावित झालेली आहे. अशा परिस्थितीतही नाशिक शहरात रोज शंभर रक्‍तदाते स्वयंस्फूर्तीने रक्‍तदान करीत आहेत. अनेकांकडून रक्‍तदान शिबिराचीही विचारणा होत आहे. त्यामुळे जागतिक संकटाच्या काळातही नाशिककर सामाजिक भान जपत असल्याचे बघायला मिळत आहे. 

संवेदनशीलतेचे घडतंय दर्शन

गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळतोय. नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. त्यामुळे शहरात रक्‍तदान शिबिरांचे प्रमाणही घटले आहे. दुसरीकडे विविध शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्‍ताची आवश्‍यकता मात्र थांबलेली नाही. अशा परिस्थितीतही नाशिककरांकडून संवेदनशीलतेचे दर्शन घडत आहे. अनेक नागरिक स्वत: रक्‍तपेढ्यांशी संपर्क साधून रक्‍तदानासंदर्भात विचारणा करीत आहेत. रोज सरासरी शंभर दाते रक्‍तपेढ्यांमध्ये हजेरी लावत असल्याचेही सांगितले जात आहे. शहरासह ग्रामीण भागातूनही रक्‍तदान शिबिरांसाठी विचारणा होत आहे. नागरिकांच्या या संवेदनशीलतेची दखल घेत अनेक स्वयंसेवी संस्थादेखील मदतीला धावून येत आहेत. रक्‍तदात्यांना रक्‍तपेढीपर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था शहरातील काही स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. 

हेही वाचा > COVID-19 : लॉक-डाऊनमुळे 'ई-कॉमर्स'तर्फे सेवा खंडित; केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची उपलब्धता

Image may contain: one or more people, car and outdoor

आम्हाला रोज साधारणत: पन्नास जण फोनद्वारे संपर्क साधून रक्‍तदानाची इच्छा व्यक्‍त करीत आहेत. प्रत्यक्ष रक्‍तपेढीला भेट देऊन रक्‍तदान करणाऱ्यांचीही संख्या चांगली आहे. 15 एप्रिलपर्यंत पुरेल इतका रक्‍तसाठा सध्या उपलब्ध असला, तरी अशा आपत्कालीन परिस्थितीत नाशिककरांनी जपलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. - डॉ. नंदकिशोर तातेड, अध्यक्ष, अर्पण रक्‍तपेढी  

हेही वाचा > 'ग्राहकांनो, कांदा खरेदीकडील हात आखडता घ्यावा लागणार वाटतंय!'...कारण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood donation from hundreds of people daily in Nashik nashik marathi news