स्वत:च्याच घरी चक्क चोरी..विश्वासघात करून 'तो' झाला पसार!

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 एप्रिल 2020

सुमारे चार लाख रुपये किमतीचा ऐवज विश्‍वासघात करून फ्लॅटमधून घेऊन गेल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

नाशिक : किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरात मुलाने वडिलांच्या फ्लॅटमधील सामान चोरल्याची घटना घडली. निर्माण पवार (रा. होलाराम कॉलनीसमोर, शरणपूर रोड) असे संशयित मुलाचे नाव आहे.

केली वडिलांच्या घरात चोरी 

या प्रकरणी वामन पवार (वय 67, रा. हल्ली गोरक्षनगर, म्हसरूळ) यांच्या फिर्यादीनुसार, पवार यांचा किशोर सूर्यवंशी मार्गावरील जुई सोसायटीत फ्लॅट असून, या फ्लॅटचे 31 जानेवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान संशयित मुलाने कुलूप उघडून घरातील धार्मिक पुस्तके, गॅस सिलिंडर, कपाट, संसारोपयोगी वस्तू, टेबल-खुर्च्या, टीव्ही, कपडे, शासकीय, निमशासकीय कागदपत्रे, तसेच न्यायालयीन कागदपत्रे, पंखे, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा ऐवज विश्‍वासघात करून फ्लॅटमधून घेऊन गेल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

दुसरी घटना : तरुणाचा मोबाईल हिसकावला 
 गंगापूर रोडवरील नाना-नानी पार्क परिसरात मेडिकल स्टोअर्समध्ये औषधे खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवीत दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली. सम्राट आघळे (वय 20, रा. सप्तशृंगी कॉलनी, गंगापूर रोड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, सम्राट आघळे सोमवारी (ता. 30) सायंकाळच्या सुमारास परिसरातील मेडिकल स्टोअर्स येथे औषधे खरेदीसाठी जात होता. पायी जात असताना नाना-नानी पार्कसमोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा > होम क्वारंटाईन झालेले बच्चू कडू म्हणतात.. "भावांनो हात जोडतो, घरीच थांबा" बाहेर पडू नका, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The boy committed theft in his father's house nashik marathi news