VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

सिन्नर शहरालगतच्या संत हरिबाबा नगरमधील आर्यन नवाळे हा मित्रांसोबत पतंग उडवत होता. पतंग पकडण्यासाठी धावत असतांना आर्यनचा अचानक तोल गेला.आणि सर्वच अघटित होऊन बसले.

नाशिक : पतंग पकडण्यासाठी धावत असतांना तोल जाऊन विहीरीत पडल्याने सिन्नरला १२ वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. इयत्ता सहावीत शिकत असलेल्या आर्यन विलास नवाळे (वय 12) असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. आज (ता. 15) सकाळी साडेदहाच्या सुमारास सिन्नर शहरालगतच्या संत हरिबाबा नगरमधील आर्यन नवाळे हा मित्रांसोबत पतंग उडवत होता. पतंग पकडण्यासाठी धावत असतांना आर्यनचा अचानक तोल गेला. आणि तो धनंजय हरिभाऊ जाधव यांच्या 50 फुट खोल विहीरीत पडला. या विहीरीत 40 फुट पाणी असून आजूबाजूच्या लोकांनी तातडीने ही माहीती त्याच्या नातेवाईकांना दिली. यावेळी हवालदार राहूल नवाळे, अंकुश दराडे, रामदास धुमाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

डाॅक्टरांनी मृत घोषीत केले.

सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाने आर्यनचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. त्याला तातडीने पालिका रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. आर्यन नवाळे हा सहावीत शिकत होता. पालिका रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. 

Image may contain: plant, outdoor, water and nature

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...

Image may contain: 2 people, plant, tree, outdoor and nature

हेही वाचा > स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy died fell into a well Nashik Marathi News