घटस्थापनेसाठी पाणी आणायला गेलेल्या समाधानच्या नशिबी असे दुर्देव; मन हेलावणारी घटना

संतोष विंचू
Sunday, 18 October 2020

एकुलत्या एक मुलासोबत गोरख सोनवणे मुखेडला आहे होते. भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेसाठी मुलाला पाणी आणला सांगितले. समाधान पाणी आणायला गेला. मात्र अर्धा पाऊण तास होऊनही तो परतलाच नाही. घटनेने उत्सवावर विरजन... 

नाशिक : (मुखेड) एकुलत्या एक मुलासोबत गोरख सोनवणे मुखेडला आहे होते. भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेसाठी मुलाला पाणी आणला सांगितले. समाधान पाणी आणायला गेला. मात्र अर्धा पाऊण तास होऊनही तो परतलाच नाही. घटनेने उत्सवावर विरजन... 

अशी आहे घटना

गोरख पुजाबा सोनवणे हे मुसळगाव एमआयडीसीत नोकरीला आहेत. मुखेड येथे त्यांची एक हेक्‍टर शेतजमीन आहे. पारंपारिक धार्मिक विधी करण्यासाठी ते व त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा समाधान याचासह येथील भवानी मंदिरात घटस्थापना करण्यासाठी आले होते. मुखेड-महालखेडा रस्त्यावर श्री. भवानी मातेचे मंदिर आहे. परिसरातील शेतकरी ग्रामस्थांकडून या मंदिरात घटस्थापना केली जाते. गोरख सोनवणे हे भवानीमातेच्या मंदिरात पूजेसाठी थांबले होते. सोबत आलेला त्यांचा मुलगा समाधान सोनवणे (वय 15) देवीच्या पूजेसाठी पाणी आणण्यासाठी मंदिरालगत असणाऱ्या अरुण पगार यांची शेतजमीन गट नंबर 940 मधील शेततळ्यावर गेला होता. सुमारे अर्धा पाऊण तासाचा विलंब होऊन ही समाधान येत नसल्यामुळे गोरख सोनवणे हे तळ्यावर गेले. तळ्याच्या काठावर समाधानचे सॅंडल दिसून आल्यावर त्यांना पाणी भरून घेताना समाधान पाण्यात पडला असावा अशी शंका आली. यावर त्यांनी माजी उपसरपंच रत्नाकर आहेर यांच्याकडे संपर्क साधून मदतीची मागणी केल्यावर यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

घटस्थापनेला गालबोट

पट्टीच्या पोहणाऱ्या नवनाथ भवर या युवकास तळ्यात उतरवण्यात आल्यानंतर त्यांनी समाधानचे पार्थिव बाहेर काढले. दुर्दैवाची बाब म्हणजे समाधान हा गोरख सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रसंगी माजी सरपंच अनंता आहेर, पोलीस पाटील सुरेश वाघ, अरुण आहेर, महेश अनर्थे, विनायक आहेर आदींसह ग्रामस्थांनी हजर राहून मदत कार्यात सहभाग घेतला. पोलीस हवालदार गंभीरे, हेंबाडे पोलीस कॉन्स्टेबल लकडे हे पुढील तपास करीत आहे. नवरात्रीच्या पवित्र पावन सोहळ्याच्या प्रारंभालाच अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy drowned while fetching water for ghatsthapna nashik marathi news