नाशिक : (ब्राह्मणगाव) लग्नसोहळ्यात वऱ्हाडी पाहुण्यांची वाहने, वाजंत्री अशा अवास्तव खर्चाला फाटा देत येथील शेतकरी असलेल्या थोरात कुटुंबीयांनी वधू-वरांना मंडपातून बैलगाडीत बसून बिदाई केली. त्यामुळे यानिमित्ताने अनेक जुन्या जाणकारांना पारंपरिक विवाहाची अनुभूती कित्येक वर्षांनंतर आली.
अशी निघाली वरात...
रवींद्र थोरात यांचा मुलगा भूषण व मोठाभाऊ अहिरे यांची कन्या गायत्री यांचा शानिवारी (ता. 18) लग्नसोहळा थाटात पार पडला. या बैलांना पोळ्याच्या दिवशी सजविले जाते त्याप्रमाणे विविध रंगीतसंगीत फुलांच्या माळांनी बैलगाडी सजविण्यात आली होती. बैलगाडीवर नववधू-वरास बसण्यासाठी आसन ठेवण्यात आले होते.
"झाडे लावा, झाडे जगवा" असा संदेश
झाडांच्या हिरव्या फांद्यांनी व रोपट्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेशही अधिक लक्षवेधी ठरत होता. गावातून वधू-वरांची सवाद्य मिरवणूक काढत देवदर्शन केले. या मिरवणुकीला कृषिमंत्री दादा भुसे यांचीही हजेरी होती.
हेही वाचा> लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..
शेतकरी, भूमिपुत्र असल्याने निर्णयाचा आनंद
थोरात व अहिरे परिवार यांनी विवाह सोहळा आयोजित केला. मित्र या नात्याने शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो आहे. मला आनंद होतो आहे, की आपण शेतकरी, भूमिपुत्र आहोत, त्या दृष्टिकोनातून वधू-वरांची वरात निघाली आहे. या विवाह सोहळ्याची सांगता वधू-वर बैलगाडीतून प्रवास करून होत आहे. त्यांच्या या निर्णयाचा मी आनंद व्यक्त करतो. - दादा भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.