..अन्‌ 'भावाची' बहिणीला भेटण्याची इच्छा अपूर्णच...बहिणाने फोडला हंबरडा...गावात हळहळ  ​

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

बहिणीला भेटण्यासाठी तो दुचाकीने निघाला होता. पण त्यालाही माहित नव्हते की त्याची भेट अपूर्ण राहिल तिला भेटण्याची...कारण वाटेतच काळाचा असा घाला आला की सर्वच उद्धवस्त झाले...

नाशिक / देवळा : बहीणीला भेटण्यासाठी तो दुचाकीने निघाला होता. पण त्यालाही माहित नव्हते की त्याची भेट अपूर्ण राहिल तिला भेटण्याची...कारण वाटेतच काळाचा असा घाला आला की सर्वच उद्धवस्त झाले...

बहिणीला भेटण्यासाठी निघाला पण....

घाणेगाव (ता. मालेगाव) येथील सोमनाथ मोरे (वय 32) मानूर (ता. कळवण) येथे बहिणीला भेटण्यासाठी मोटारसायकलने (एमएच 19 डीएच 5067) जात असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्याला शिवनाला वळणावर धडक दिली.त्यात डोक्‍याला जबर मार लागल्याने सोमनाथ जागीच ठार झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुहास देशमुख, प्रकाश सोनवणे, परशराम जाधव अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा > भयंकर..आमरस खाण्यासाठी नाशिकच्या पाहुण्यांना खास निमंत्रण..अन् तिथेच झाला घात..! गावात दहशत..

अपघाताचा गुन्हा दाखल

विठेवाडी (ता. देवळा) दरम्यान असलेल्या शिवनाला वळणावर शुक्रवारी (ता.3) अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने त्यावरील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यासंदर्भात देवळा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा >  सोसायटीचे कर्ज..लहान बहिणीचे लग्न..लहान वयातच जबाबदारीचं ओझं..एका भावाची नशिबाशी झुंज अपयशी..

...त्यामुळे वाहनचालक येथे भांबावतात
येथील वसाका ते नेपाळी रस्त्यावर अनेक ठिकाणी वळणे असल्यामुळे येथे कायम अपघात होत असतात. येथे नागरिकांच्या मागणीनुसार गतिरोधक टाकण्यात आले असले, तरी त्यावर पांढरे पट्टे मारलेले नसल्याने अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालक येथे भांबावतात. त्यामुळे गतिरोधकांवर तातडीने पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक शेतकरी कुबेर जाधव, शशिकांत निकम, संजय पवार, योगेश पवार, दयाराम बोरसे, आप्पाजी पवार यांनी केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brothers wish to meet his sister is unfulfilled nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: