नवीन इमारतीच्या प्रतीक्षेतच 'हे' रुग्णालय!..जुने रुग्णालय सलाइनवर.. 

bytco hospital.jpg
bytco hospital.jpg

नाशिक : नाशिकरोड आणि आसपासच्या पंचक्रोशीतील गावांमधील रुग्णांचा आधार मानल्या जाणारे बिटको रुग्णालय सध्या सलाइनवरच आहे. कर्मचाऱ्यांच्या अत्यल्प संख्येबरोबरच येथील कामचुकार कर्मचारी, डॉक्‍टरांमुळे रुग्णांना वनवास सहन करावा लागत आहे. नवीन इमारतीचे कामही रखडले असून, नागरिक प्रतीक्षेत आहेत. विद्यमान सरकारकडून हे रुग्णालय सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

कर्मचाऱ्यांची व डॉक्‍टराची संख्या कमी असल्यामुळेच रुग्णांची परवड

2011 मध्ये नयना घोलप महापौर असताना व डॉ. सीमा ताजणे नगरसेविका असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या इमारतीचे भूमिपूजन केले होते. मात्र, आठ वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या कर्मदरिद्रीपणामुळे हे रुग्णालय ऊर्जितावस्थेत येऊ शकलेले नाही. रुग्णांना मिळणाऱ्या सेवासुविधा अपुऱ्या असून, या ठिकाणी पूर्णवेळ किंवा अर्धवेळ फिजिशियन नाहीत. नाशिकरोडसह सिन्नर फाटा, दसक, पंचक, जेल रोड, उपनगर, जाखोरी, शिंदे, पळसे, सोनगिरी, चांदगिरी, देवळालीगाव, विहितगाव, वडनेर, रोकडोबावाडी, जेल रोड, चेहेडी यांसह पंचक्रोशीतील गरीब रुग्ण या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. मात्र, कर्मचाऱ्यांची व डॉक्‍टराची संख्या कमी असल्यामुळेच या ठिकाणी रुग्णांची परवड होत आहे. 

अनेक वेळा रुग्ण खासगी रुग्णालयाचा आधार

रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा रुग्ण खासगी रुग्णालयाचा आधार घेतात. येथील डॉक्‍टर आपला खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यातच मग्न असतात. शासनाने लोककल्याणासाठी उभे केलेले रुग्णालय सध्या वैद्यकीय दुष्काळाच्या छायेत लोटले गेलेले आहे. याला शासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधींचा कर्मदरिद्रीपणा जबाबदार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

बांधकाम रखडले 

2011 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या या रुग्णालयाचे बांधकाम रखडलेले आहे. पटेल बिल्डर्स यांनी स्वीकारलेल्या या ठेक्‍यातून आजपर्यंत लाखोंचा मलिदा लोकप्रतिनिधींनी खाल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या या रुग्णालयाला ठाकरे यांनीच ऊर्जितावस्था द्यावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com