भारतीय लेकींसाठी सरसावल्या साता समुद्रापार असलेल्या भारतीय वंशाच्या कॅनेडियन लेकी

canedian help.jpg
canedian help.jpg

डीजीपी नगर (नाशिक) : श्री विरभद्र माध्यमिक विद्यालय कोशिंबे दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील शाळा या विद्यालयातील कलाशिक्षक सायकलिस्ट संजय पवार यांनी  नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून झाली. सायकलिस्ट अविनाश पठारे कॅनडामध्ये राहणाऱ्या वर्ग मैत्रीण राजश्री या भारतात आल्या असताना त्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी विशेष सामाजिक कार्य करावे ही अभिलाषा उराशी बाळगून  
स्व-खर्चातून शौचालय बांधण्याचा विचार अविनाश यांना सांगितला आणि कोशिंबे शाळा या प्रोजेक्ट साठी योग्य वाटली. शाळेत साधारणतः २५० ते ३०० मुली रोज ज्ञानार्जनासाठी येतात.

वर्षाला एक तरी टॉयलेट शाळेत बांधण्याचा निर्धार

अविनाश यांना शाळेत टॉयलेटची गरज असल्याचे सांगितले. सगळे योग जुळून आले आणि  टॉयलेट बांधण्याच्या उपक्रमाला  सुरुवात झाली. राजश्री आणि बाकीच्या अजून काही कॅनेडियन भारतीय महिलांनी एकत्र येऊन ह्या प्रोजेक्ट साठी निधी उभा केला आणि टॉयलेट कोरोना चालू असताना बांधले ज्यात बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. आनंदाची गोष्ट हि कि टॉयलेट शाळा सुरु होण्यापूर्वी तयार झाले. ह्या कॅनडा मध्ये स्थायिक असलेल्या कॅनेडियन भारतीय महिला असे बरेच वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असतात. अनेक राज्यांमध्ये व खेड्यांमध्ये असलेल्या शाळेत टॉयलेटचे  मह्त्व लक्षात घेता, मुलींसाठी म्हणून या महिलांनी एकत्र येऊन वर्षाला एक तरी टॉयलेट शाळेत बांधण्याचा निर्धार केला आहे.

या लेकींनी भारतातच नव्हे तर अनेक ठिकाणी समाजकार्य
आजपर्यंत या लेकींनी भारतातच नव्हे तर ज्या देशात म्हणजेच कॅनडात राहतात त्या ठिकाणीही त्यांनी अनेक समाजकार्य केले आहे. अनाजदान,मुलींचे शिक्षण व जास्त करून मुलींसाठी भारतात शौचालय देणे असे महत्वाचे कार्य त्यांच्या हातून घडत आहेत. आपल्या भारतातील बऱ्याच  महिला या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. नवस करणे मंदिरात प्रचंड दान करणे ,अंधश्रद्धा पाई गरज नसताना खर्च करणे. आपल्या भारतीयांसाठी या कॅनेडियन भारतीय महिलांचा आदर्श घेऊन गरजू गव्हर्मेंट स्कूल ला सढळ हाताने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी. शाळा सुधारल्या तरच समाज सुधरेल. दान करायचेच असेल तर विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य कसे जास्तीत जास्त सुखकर होईल ह्या दृष्टीने करता येईल. 

वीरभद्र माध्यमिक विद्यालय कोशिंबे च्या मुख्याध्यापक आणि सर्व उपक्रम घडवून आणणारे कलाशिक्षक संजय पवार यांचे  कॅनेडियन भारतीय महिलांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com