नगरपरियोजना रद्द करा; शेतकऱ्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी

sharad pawar at nashik
sharad pawar at nashik

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीतर्फे मखमलाबाद व हनुमानवाडी येथे ७५३ एकरवर उभारण्यात येणारी नगरपरियोजना रद्द करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मखमलाबाद व हनुमानवाडी येथे स्मार्टसिटी कंपनीतर्फे नगरपरियोजना राबविली जाणार आहे. येथील जमीन बागायती असून, त्या प्रकल्पासाठी देण्यास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावरील शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोध मोडून काढत चुकीच्या पद्धतीने योजना राबविली जात आहे. विरोध असतानाही नुकताच योजनेचा अंतिम उदघोषणेचा मसुदा जाहीर करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. येथील माल परदेशात निर्यात केला जातो. ज्या भागात योजना राबविली जात आहे, तो भाग नदीच्या पूररेषेत येत असतानाही चुकीच्या पद्धतीने योजना राबविली जात आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार पवार यांच्याकडे केली. स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, श्याम काश्मिरे, पंडित तिडके आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com