PHOTOS : नाशिक-मुंबई महामार्गावर बर्निंग कारचा थरार..महामार्ग पोलीसांचा मात्र पत्ताच नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

गाडीला आग लागल्याने तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाल्यानंतर देखील महामार्ग पोलीस घटनस्थळी आले नाहीत. मात्र रोज सकाळी नऊ ते एक वाजे दरम्यान इगतपुरी महींद्रा कंपनी समोरील महामार्गावर वाहन तपासणीच्या नावाखाली वाहन चालकांकडुन कागद पत्रांची मागणी करून सर्रास लुट करत असल्याची तक्रार वाहन चालक करीत आहे.

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटाच्याखाली साईबाबा खिडींत गाडीला गुरुवारी ( ता.१६) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने महामार्गावर बर्निंग कारचा थरार काळीज पिळवटून टाकणारा होता. 

असा घडला प्रकार...

झायलो कार (क्रमांक MH15 FU 9292) कार नाशिकहुन मुंबईकडे जात असताना साईबाबा खिंड लगतच्या ब्रिजवर गाडी खड्यात आदळली व अचानक गाडीने पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच गाडी चालक आवेद खान व सोबतच्या सह प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत गाडीतून बाहेर पडून जीव वाचवला. गाडी पेटत असल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य व पीक इंफ्रा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 
आगीचे तांडव लक्षात घेत काही अंतरावर वाहने रोखून धरीत पोलीस व अग्निशमन दलास संपर्क केला. परिणामी तो पर्यंत पूर्ण गाडी जळून खाक झाली होती. या घटनेमुळे सुमारे एक तासाच्या वर वाहतुक कोंडी झाली होती.
दोन्ही टीमने कसारा पोलीस कर्मचारींच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेनवरून वळवून वाहतूक सुरळीत केली. बर्निंग कारची घटना समजताच ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांनी घटनेची माहिती घेत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. दरम्यान या घटनेत कुठलीही दुखापत झाली नाही.
Image may contain: night, fire, car and outdoor

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

अन् महामार्ग पोलीस आलेच नाही.. 
दरम्यान गाडीला आग लागल्याने तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाल्यानंतर देखील महामार्ग पोलीस घटनस्थळी आले नाहीत. मात्र रोज सकाळी नऊ ते एक वाजे दरम्यान इगतपुरी महींद्रा कंपनी समोरील महामार्गावर वाहन तपासणीच्या नावाखाली वाहन चालकांकडुन कागद पत्रांची मागणी करून सर्रास लुट करत असल्याची तक्रार वाहन चालक करीत आहे. यामुळे येथेही सकाळी नऊ ते एक वाजे दरम्यान मोठी वाहतुक कोंडी होत असुन याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी वाहनचालक करीत आहे.

Image may contain: fire, night and outdoor
क्लिक करा > "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..                    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car accident at nashik mumbai highway nashik marathi news