PHOTO : टायर बदलीसाठी साईभक्त रस्त्यावर उतरला...अन् धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

कांदिवली येथून शिर्डी येथे साई दर्शनासाठी सहा भाविक झायलो कारने (एमएच 02 डब्ल्यूए 7393) ने रविवारी (ता.12) पहाटे पाचला जात होते. कार व्हीटीसी फाट्यावर आली असता कारचे टायर पंचर झाले. टायर बदलीसाठी चालक टायर खोलत असताना अचानक सर्वांना धक्काच बसला.

नाशिक : कांदिवली येथून शिर्डी येथे साई दर्शनासाठी सहा भाविक झायलो कारने (एमएच 02 डब्ल्यूए 7393) ने रविवारी (ता.12) पहाटे पाचला जात होते. कार व्हीटीसी फाट्यावर आली असता कारचे टायर पंचर झाले. टायर बदलीसाठी चालक टायर खोलत असताना अचानक सर्वांना धक्काच बसला.

असा घडला प्रकार...
कांदिवली येथून शिर्डी येथे साई दर्शनासाठी सहा भाविक झायलो कारने (एमएच 02 डब्ल्यूए 7393) ने रविवारी (ता.12) पहाटे पाचला जात होते. कार व्हीटीसी फाट्यावर आली असता कारचे टायर पंचर झाले. टायर बदलीसाठी चालक टायर खोलत असताना मागून येणाऱ्या कंटेनरने (एमएच 43 बीपी 1485) धडक दिली. मुंबई-आग्रा महामार्गावरील व्हीटीसी फाट्यावरील साईप्रणाम हॉटेलसमोर टायर बदलीसाठी उभ्या असलेल्या झायलो कारला कंटेनरने मागून धडक दिल्याने कारचालक ठार, तर पाच प्रवासी जखमी झाले.  त्यात चालक राजीव बिहारी (वय 28) जागीच ठार झाला. कारमध्ये बसलेले चंद्रशेखर यादव (33), जोगेश्‍वरी सुमन कुमार धनंजय झा (30), धर्मेंद्रकुमार गोंड (30), पिंटू ओमप्रकाश (25 सर्व रा. कांदिवली), ललीतकुमार शिवप्रसाद झा (28, रा. चारकोप मार्केट) जखमी झाले. जखमींना नरेंद्र महाराज सेवाभावी संस्थेच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

Image may contain: people standing, car, sky and outdoor

वाडीवऱ्हे : अपघातग्रस्त झायलो कार. 

नक्की बघा > PHOTOS : अकराव्या वर्षी समजले किन्नर झाल्याचे...अन् थेट झाली लोकांची आयडॉल!

हेही बघा >  धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car accident at vadivhare Nashik Marathi News