PHOTOS : नियंत्रण सुटले..अघटित घडले...उद्योजकसह पत्नीही...

गोपाळ शिंदे : सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 8 February 2020

घटनेची माहिती घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, महामार्ग घोटी टॅपचे सहाय्यक निरीक्षक अमोल वालझाडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घोटी टोल नाका अपघात निवारण पथक कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेद्वारे घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर खंबाळे शिवारात शुक्रवारी (ता. 7) सकाळी दहाला ट्रक व अर्टिगा वाहन यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. खंबाळे शिवारात मुंबईकडून नाशिककडे अर्टिगा (एमएच 04, एचएक्‍स 6994)ने महिला चालक भारती राणे व ठाणे येथील उद्योजक संजय राणे येत होते.

Image may contain: car, sky and outdoor

अशी घडली घटना...

भरधाव वेगामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून पुढे चालणाऱ्या ट्रक (एमएच 28, एबी 8446)ला पाठीमागून जोरदार धडक दिली. अर्टिगामधील भारती राणे व त्यांचे पती संजय हे जखमी झाले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरीश चव्हाण यांनी घोटी पोलिस व टोल नाका येथील रुग्णवाहिकेस माहिती दिली.

Image may contain: one or more people and people sitting

घटनेची माहिती घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, महामार्ग घोटी टॅपचे सहाय्यक निरीक्षक अमोल वालझाडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घोटी टोल नाका अपघात निवारण पथक कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेद्वारे घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथील वक्रतुंड रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. 

Image may contain: 1 person, standing

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​

Image may contain: one or more people, people standing, mountain and outdoor

हेही वाचा > PHOTOS : बहिण-भावाची भेट होण्यापूर्वीच मोठा आक्रोश... ह्रदय पिळवटून टाकणारी घटना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car and truck accident at ghoti Nashik Marathi News