गोव्यात रचला कारचोरीचा कट; नाशिकमध्ये फिस्कटला प्लॅन, दोघांना अटक

यूनुस शेख
Tuesday, 6 October 2020

 तीन दिवसांपूर्वी दोघांचा चारचाकी विक्रीचा कट रचला. त्याने स्वतःची चारचाकी एकाच्या सहाय्याने विक्री केली होती. त्यातून ओळख झालेल्याच्या मार्फतच गोव्यातून चोरी केलेली चारचाकी विक्री करायचे ठरले. पण नाशिकमध्ये पोलीसांनी प्लॅन उधळवून लावला. काय घडले वाचा

नाशिक : तीन दिवसांपूर्वी दोघांचा चारचाकी विक्रीचा कट रचला. त्याने स्वतःची चारचाकी एकाच्या सहाय्याने विक्री केली होती. त्यातून ओळख झालेल्याच्या मार्फतच गोव्यातून चोरी केलेली चारचाकी विक्री करायचे ठरले. पण नाशिकमध्ये पोलीसांनी प्लॅन उधळवून लावला. काय घडले वाचा

असा घडला प्रकार

अंबरनाथ येथील संशयित ओंकार जाधव (वय २५) कामानिमित्त गोवा येथे राहात होता. तेथील एका टुरमध्ये भाडेतत्त्वावर चालणाऱ्या वाहनावर चालक म्हणून तो काम करीत होता. तीन दिवसांपूर्वी त्याचा सहकारी नितीन निमजे (२५, रा. बदलापूर, हल्ली गोवा) याच्या मदतीने चारचाकी विक्रीचा कट रचला. त्याने स्वतःची चारचाकी एकाच्या सहाय्याने विक्री केली होती. त्यातून ओळख झालेल्याच्या मार्फतच गोव्यातून चोरी केलेली चारचाकी (जीएओ ३ डब्ल्यू ७६९९) विक्री करायचे ठरले. पोलिसांना दोन्ही संशयित द्वारका भागात चारचाकी विक्रीस येत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे पथकाने द्वारका भागात सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. चारचाकी विक्रीच्या उद्देशाने आल्याचे त्यांनी सांगितले. चारचाकी राज्यात दाखल होताना टोल नाक्यावर ऑनलाइन टोल कट झाल्याचे मालकाच्या लक्षात आल्याने मालकाने संशयित चालकास संपर्क केला. कामानिमित्ताने जात असल्याचे त्याने मालकास सांगितले. पोलिसांनी मालकाशी संपर्क केला असता त्यांना हा प्रकार समजला.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

द्वारका भागातून अटक

गोवा येथून चोरीस गेलेल्या चारचाकीसह दोघांना भद्रकाली पोलिसांनी सोमवार (ता.५) द्वारका भागातून अटक केली. भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या वाहनचालकानेच चारचाकी पळविली होती.  

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car stolen from Goa seized Both arrested nashik marathi news