शिवजयंतीला ध्वनिमर्यादेचे उल्लंघन नगरसेवकांना पडले महागात!

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 21 February 2020

नवीन नाशिक शिवजयंती समितीतर्फे काढलेल्या मिरवणुकीप्रसंगी दिव्या ऍडलॅबजवळ डीजेचा आवाज जास्त असल्याची सूचना पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केली होती. मात्र पदाधिकाऱ्यांनी या सूचनांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अंबड पोलिसांनी समितीचे अध्यक्ष भूषण बाळासाहेब कदम, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, अंकुश वराडे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. 

नाशिक (सिडको) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे नगरसेवकांसह तीन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर अंबड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. या वेळी वापरलेल्या वाद्याच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. 

पदाधिकाऱ्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष

नवीन नाशिक शिवजयंती समितीतर्फे काढलेल्या मिरवणुकीप्रसंगी दिव्या ऍडलॅबजवळ डीजेचा आवाज जास्त असल्याची सूचना पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केली होती. मात्र पदाधिकाऱ्यांनी या सूचनांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अंबड पोलिसांनी समितीचे अध्यक्ष भूषण बाळासाहेब कदम, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, अंकुश वराडे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > भयंकर! इमारतीच्या गेटवर नाव भलतेच..अन् आतमध्ये चालायचा "धक्कादायक' प्रकार..

सिडको परिसरात नगरसेवकासह तीन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा 

तसेच सिडकोतील मावळा फाउंडेशनची मिरवणूक त्रिमूर्ती चौकातून जात असताना अशाच प्रकारे आवाज मोठा ठेवल्यामुळे पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष राम ऊर्फ प्रशांत सूर्यवंशी, जितेंद्र ऊर्फ छोट्या चौधरी, सनी ऊर्फ मोठी दळवी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्याचबरोबर अंबड गावात असलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहल्ला, अंबड या मंडळाचे अध्यक्ष रवींद्र दातीर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case filed against Corporators for noise pollution Nashik Marathi News