VIDEO : चांदीचा निरांजन ताटात..माऊचा वाढदिवस थाटात!

cat birthday celebrate.jpg
cat birthday celebrate.jpg

नाशिक : सोशल मीडियाचा वाढलेला वापर बघता पोस्ट केलेला कुठला व्हिडिओ व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एका मांजरीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झालेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा टीकटॉक व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस देखील उतरत आहे. आपण कुटुंबातल्या व्यक्तीचा वाढदिवस ज्या पध्दतीने साजरा करतो. त्याच पध्दतीने मांजरीच्या मालकीन बाईने औक्षण करुन वाढदिवस साजरा केला आहे.


मांजर प्रेमींना अधिक भावला व्हिडिओ

खरंतर मांजर हा पाळीव प्राणी अनेकांच्या घरी असतो. पुर्वीच्या काळी मांजर उंदीर घरात जास्त असले की त्यामुळे पाळले जात. परंतू, सध्या हौस किंवा फॅशन म्हणून मांजर पाळले जाते. सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मांजर प्रेमींना आनंद देत आहे. काहीजण आपल्या मांजरांचं किती गोडकौतुक करतात किंवा आपल्या घरातला पाळीव प्राणी हा कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच किती महत्वाचा आहे हे या व्हिडीओतून आपल्याला पाहायला मिळत आहे.

कुटुंबातल्या खास सदस्याप्रमाणे बर्थडे साजरा

पांढऱ्या रंगाचं हे मांजर त्याला शिवलेल्या विशिष्ट कपड्यांमुळे आणखीनच गोड दिसत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत वाढदिवसाला औक्षण करण्याची परंपरा आहे. कपाळाला टिळा लावून आरतीने ओवाळलं जातं आणि तोंड गोड केलं जातं. अगदी या परंपरेप्रमाणे कुटुंबातल्या या खास सदस्याचा बर्थडे साजरा करण्यात आला. 

खारी-बिस्कीट या मराठी चित्रपटातलं गाणं माऊचे आवडीचे

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला खारी-बिस्कीट या मराठी चित्रपटातलं गाणं लावण्यात आलंय. त्यामुळे हा व्हिडिओ पाहताना खूप छान वाटतं आहे. या व्हिडिओवर अक्षरशः लाईक्सचा वर्षाव होत आहे. आत्तापर्यंत 14 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com