जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

मोठाभाऊ पगार
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

श्री. आहेर जिल्हाभर सातत्याने दौरे करून शेतकऱ्यांच्या, तसेच सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत होते. यादरम्यान कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना तशी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी तातडीने तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.

नाशिक : (देवळा) जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. श्री. आहेर जिल्हाभर सातत्याने दौरे करून शेतकऱ्यांच्या, तसेच सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत होते. यादरम्यान कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना तशी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी तातडीने तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी लगेचच स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. 

संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

गुरुवारी (ता. ३०) केदा आहेर यांची तपासणी केली असता शुक्रवारी (ता. ३१) अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी लगेचच स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर संदेश पोस्ट करत संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी, तसेच काही त्रास होत असल्यास भीती न बाळगता डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. दरम्यान, देवळा शहरासह तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गुरुवारी आणि शुक्रवारी मिळून ४८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीडशेवर जाऊन पोचली आहे. ग्रामीण भागातही कोरोना हातपाय पसरवू लागल्याने येथील चिंतेत भर पडली आहे. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

एकूण रुग्णांची संख्या १५३ इतकी

गुरुवारी आलेल्या ७७ अहवालांमध्ये २४ अहवाल पॉझिटिव्ह, तर शुक्रवारी पुन्हा ९२ अहवालांमध्ये २४ पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या १५३ इतकी झाली आहे. यात देवळा १३, उमराणा ११, वाखारी चार, विठेवाडी पाच तसेच गुंजाळनगर, कापशी, मटाणे, लोहोणेर येथील प्रत्येकी दोन, तर वाजगाव, माळवाडी, सुभाषनगर, खुंटेवाडी, फुलेमाळवाडी, सरस्वतीवाडी, भिलवाड या गावांतील प्रत्येकी एक अशा एकूण ४८ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chairman of the District Bank Keda Aher Corona Positive nashik marathi news