नाशिकमधील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी ठरतेय डोकेदुखी! तरुणाई भरकटल्याचे प्रमाण अधिक

नीलेश छाजेड
Tuesday, 17 November 2020

अवैध धंद्याचा वाढता सुळसुळाट हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे. या सर्व वाढत्या अवैध धंद्यांकडे आर्थिक देवाण घेवाणाने हेतुपूर्वक डोळेझाक केली जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे. व यातूनच गुन्हेगारीला चालना मिळते आहे. व कमी वयातले तरुण गुन्हेगारीकडे आकर्षिले जात असल्याचे काहीसे चित्र आहे.

नाशिक : नाशिकरोड व पुर्व भागातील लगतच्या काही गावांमधील वाढती गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देणारी ठरते आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून जीवे मारणे म्हणजे शुल्लक बाब झालेली दिसून येते. त्यात तुल्यबळ पोलीस व सणवार व इतर ड्युट्यांमधे तेही भरडले जात असल्याचे चित्र दिसून येते.
दोन दिवसांपूर्वी देवळाली गावात तरुणाचा कोयत्याने झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यातील आरोपी हे अवघे अठरा एकोणीसचे असतील म्हणजेच तरुणाई कुठे भरकटत चालली आहे हे अभ्यासणे गरजेचे बनले आहे. 

वाढती व्यसनाधीनता बनतेय गुन्हेगारीचे कारण
अल्पवाईन वयापासून गुटखा, सिगारेट , मद्यपान तर कमी पैशात व कुठेही उपलब्ध होणारे व्हाईटनर, पेट्रोल-थिनर, मेडिकल मधून सहज उपलब्ध होणारी काही औषधे जसे खोकल्याची औषधे, टॅगो यांचे व्यसन रेल्वे-स्थानक, परिसरातील स्लम भागात मोठ्याप्रमाणात दिसून येतो. व यातून छोटी मोठी गुन्हेगारी जी वाढती आहे ती निश्चित च पोलिसांची डोके दुखी वाढवणारी ठरू पाहत आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

वाढते अवैध धंदे व वाढती गुन्हेगारी
नाशिकरोड सह काही परिसरातील लगतच्या गावांमध्ये अवैध धंद्याचा वाढता सुळसुळाट हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे. या सर्व वाढत्या अवैध धंद्यांकडे आर्थिक देवाण घेवाणाने हेतुपूर्वक डोळेझाक केली जाते असे नागरिकांचे म्हणणे आहे. व यातूनच गुन्हेगारीला चालना मिळते आहे. व कमी वयातले तरुण गुन्हेगारीकडे आकर्षिले जात असल्याचे काहीसे चित्र आहे.

उद्यान व जॉगिंग ट्रॅक बनू पाहताय टोळक्यांचे बैठकीचे अड्डे
गाडेकर मळ्यातील जॉगिंग ट्रॅक व आजूबाजूचे उद्यान ही अंमली व गुन्हेगारी पार्श्वभूमी चे तरुण येथे येऊन बसतात गांजा ओढणे, मद्यपान करणे हा विषय परिसरातील लोकांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे. छत्रपती शिवाजी समाज मंदिर भागात मद्यपान, तरुण तरुणींचे अश्लील चाळे यामुळे महिलांना याभागातून फिरणे मुश्किल झाले आहे.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

पोलिसांना आव्हान
नाशिकरोड सह, देवळाली गांव, जेलरोड, एकलहरे आदी भागात किरकोळ वादातून, जुन्या भांडणातून मारामाऱ्या, प्राण घातक हल्ले हे अधून सुरूच असतात आणि ही वाढती गुन्हेगारी व नव्याने बनलेल्या कोयता गॅंग, रुमाल गॅंग अशा टोळ्या पोलिसांना आव्हान ठरू पहात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenge for rising crime police nashik marathi news