"अजित पवारांकडे जादूची कांडी" - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 2 March 2020

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात नाशिकच्या भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. पाटील हे सकाळी नाशिकला आले. त्यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांची बंद दाराआड चर्चा केली. पण, नगरसेवकांचा पत्ताच नसल्यामुळे सर्व काही अलबेल आहे, असे सांगत त्यांनी वेळ मारुन नेली. त्यानंतर ते सायंकाळी पुन्हा भाजप कार्यालयात आले.

नाशिक : 'अजित पवार यांच्याकडे जादूची कांडी आहे. ते अडचणीत असले की शांत असतात. पण, खुश असले की त्यांचे हात आकाशाला भिडतात.' मुंबईत उपमुख्यमंत्री यांनी मुंबई महापालिकेत ८ नगरसेवकांची संख्या ६० वर जायला हवी, या वक्तव्यावरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. 

मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण केवळ धूळफेक

ओबीसीमध्ये ९० टक्के मुस्लिमांना आरक्षण मिळाले आहे. १० टक्के मुस्लिमांना केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणात लाभ मिळणार आहे. त्यामुळे ५ टक्के आरक्षण ही धूळफेक आहे. मुस्लिम आरक्षण ५ टक्के जाहीर करुन मराठा व ओबीसी आरक्षणावर गदा येवू शकते, असेही पाटील म्हणाले. तसेच, सीएएला विरोध केला जातो आहे. केवळ राजकारण म्हणून हा विरोध आहे. नक्षलवादी अस्थिरता निर्माण करतात. त्यांच्या प्लॅनला बळ देण्याचे काम केले जात आहे.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

कोअर कमिटीच्या सदस्यांची बंद दाराआड चर्चा​

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात नाशिकच्या भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. पाटील हे सकाळी नाशिकला आले. त्यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांची बंद दाराआड चर्चा केली. पण, नगरसेवकांचा पत्ताच नसल्यामुळे सर्व काही अलबेल आहे, असे सांगत त्यांनी वेळ मारुन नेली. त्यानंतर ते सायंकाळी पुन्हा भाजप कार्यालयात आले.

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil said about ajit pawar and political statement Nashik Marathi News