चांदवडला रेणुकामाता यात्रोत्सव रद्द; घटी बसण्याची हजारो वर्षांची परंपरा खंडित

भाऊसाहेब गोसावी
Tuesday, 13 October 2020

चांदवडच्या रेणुकादेवीच्या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे घटी बसणाऱ्या शेकडो महिला. ही घटी बसण्याची हजारो वर्षांची परंपरा यात्रोत्सव रद्द झाल्याने खंडित झाली आहे.

नाशिक / चांदवड : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चांदवडच्या कुलस्वामिनी श्री रेणुकामातेचा नवरात्रीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार व सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.

घटी बसण्याची हजारो वर्षांची खंडित

चांदवडच्या रेणुकादेवीच्या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे घटी बसणाऱ्या शेकडो महिला. ही घटी बसण्याची हजारो वर्षांची परंपरा यात्रोत्सव रद्द झाल्याने खंडित झाली आहे. यात्रोत्सव रद्द झाला असला तरी कुलस्वामिनी श्री रेणुकामातेचे ऑनलाइन दर्शन व ऑनलाइन देणगी स्वीकारण्याची व्यवस्था संस्थानने केली आहे. नवरात्र उत्सव काळात देवीची पूजा, अभिषेक, आरती हे पुजारी व सेवेकरी यांनाच केवळ मंदिरात प्रवेश दिला जाऊन केली जाणार आहे.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

चांदवडला रेणुकामाता यात्रोत्सव रद्द 

नवरात्रोत्सवासंदर्भात चांदवड येथील पोलिस ठाण्यात मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, तहसीलदार प्रदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, नगर परिषदेचे अभियंता शेषराव चौधरी, अनिल कुरे, संजय गुरव, नायब तहसीलदार वरही.के.जोशी, सोमा टोलचे प्रशांत ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी रेणुकामाता मंदिर ट्रस्ट, महसूल, पोलिस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत यंदा नवरात्रोत्सव रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandwad Renukamata yatra canceled nashik marathi news