दुरांतो एक्सप्रेस रेल्वेच्या क्रमांकात बदल; रेल्वे प्रशासनाची माहिती

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Wednesday, 14 October 2020

रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडीच्या क्रमांकात बदल केला आहे. गाडी (०२१८९) डाउन मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडी १० ऑक्टोबरपासून पुढील आदेश येईपर्यंत रोज रात्री सव्वाआठला मुंबईहून निघेल.

नाशिक रोड : रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडीच्या क्रमांकात बदल केला आहे. गाडी (०२१८९) डाउन मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडी १० ऑक्टोबरपासून पुढील आदेश येईपर्यंत रोज रात्री सव्वाआठला मुंबईहून निघेल.

मुंबई-नागपूर दुरांतोच्या क्रमांकात बदल;

दुसऱ्या दिवशी नागपूरला सकाळी सव्वासातला नागपूरला पोचेल. तर परतीची गाडी (०२१९०) अप नागपूर-मुंबई दुरांतो विशेष गाडी नागपूरहून  रात्री पावणेनऊला सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी आठला मुंबईला पोचेल. गाडीत आठ शयनयान श्रेणी, नऊ वातानुकूलित तृतीय श्रेणी,  दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित प्रथम श्रेणी याप्रमाणे डबे असतील. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change in Mumbai Nagpur Duranto number nashik marathi news