VIDEO : "शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा! फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे मिळाले २ कोटी ७४ हजार" - IGP प्रतापराव दिघावकर

विनोद बेदरकर/ केशव मते
Wednesday, 7 October 2020

नाशिक परिक्षेत्रातील जळगांव, नंदुरबार व धुळे, अहमदनगर व नाशिक ग्रामीण या ५ जिल्ह्यात फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल 2 कोटी 74 हजार रुपये मिळवून दिले. याबाबत माहीती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

नाशिक : नाशिक परिक्षेत्रातील जळगांव, नंदुरबार व धुळे, अहमदनगर व नाशिक ग्रामीण या ५ जिल्ह्यात फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल 2 कोटी 74 हजार रुपये मिळवून दिले. याबाबत माहीती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

१० एसआयटी पथकाची नेमणूक

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे. अश्या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी ७४ हजार पैसे परत मिळवून दिले. तसेच 3 कोटी 65 लाख पैसे परत मिळण्याची हमी मिळाली अशी माहिती IGP प्रताप दिघावकर यांनी दिली. दिघावकर म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र ५९३ गुन्हे घडले, नाशिकमध्ये ५५९, नगर २, जळगाव १७, नंदुरबार १३, धुळे २ असे गुन्हे घडले. शेतकरी फसवणुकीचे पैसे मिळविण्यासाठी १० एसआयटी पथक नेमली असून पर राज्यातील व्यापाऱ्यांकडून पैसे मिळविण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहे,    

5 हजार शेतकऱ्यांची फसवणूक                            

३ वर्षात साधारण ५ हजार शेतकरी फसले आहेत, आतापर्यंत ९१ गुन्हे दाखल झाले असून १०३ जण पैसे देण्यास तयार झाले. दिलासादायक बाब म्हणजे अनेक वकीलही आता शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी मोफत खटले लढवणार आहे. शेतकऱ्यांना दिलेले बाऊन्स धनादेशाचे खटले लढण्यासाठी वकील देखील पुढे आले आहेत.

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा

त्यांची गाठ माझ्याशी

जे व्यापारी बळीराजाचे घामाचे पैसे बुडवतील, त्यांची गाठ माझ्याशी आहे. कायदेशीर जबाबदारीपेक्षाही नैतिक जबाबदारी मोठी समजून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वसूल करून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिला.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheated farmers got their money nashik marathi news