संपत्तीसाठी काहीही? चक्क मृत व्यक्ती उभा करून फसवणूक

विनोद बेदरकर
Friday, 25 September 2020

 संपत्ती आपल्याला एकट्याला मिळावी म्हणून कधीकधी असे डाव आखले जातात की मृत व्यक्तींना सुध्दा कागदोपत्री जिवंत केले जाते. असाच एक डाव आखण्यात आला. काय होता तो प्रकार वाचा...

नाशिक : संपत्ती आपल्याला एकट्याला मिळावी म्हणून कधीकधी असे डाव आखले जातात की मृत व्यक्तींना सुध्दा कागदोपत्री जिवंत केले जाते. असाच एक डाव आखण्यात आला. काय होता तो प्रकार वाचा...

असा घडला प्रकार

दुय्यम निबंधक पिरजादे यांच्या तक्रारीनुसार प्रफुल कैलास आहेर (रा. पंचवटी) याने २० डिसेंबर २०१८ ला पिनॅकल मॉल येथील दुय्यम निबंधक वर्ग २ या कार्यालयात  २१ फेब्रुवारी २००४ ला मृत झालेले भाईदास भारोटे या व्यक्तीच्या नावाने चक्क बनावट व्यक्ती उभा केला. आणि म्हसरुळ (ता.जि.नाशिक) येथील प्लॉटपैकी १६२.७५ चौरस मीटर मिळकतीचे खोटे कागदपत्र बनविले.  मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे बनविले तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रफुल आहेर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मृत व्यक्तीच्या नावे बनावट व्यक्ती उभा करुन सहनिबंधक कार्यालयात जमिनीचे दस्त व नोंदणीतून फसवणूकीचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी नाशिकचे सह दुय्यम निबंधक अन्वर शेखलाल पिरजादे (वय ५४, दुय्यम निबंधक) यांच्या फिर्यादीवरुन मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating by raising a dead person nashik marathi news