मॉडलिंगमध्ये करिअरचे अमीष दाखवत केला महिलेचा विश्वासघात; पोलिसांत गुन्हा दाखल

अंबादास शिंदे
Thursday, 29 October 2020

महिलेवर घरी नेऊन गुंगीचे औषध देत बळजबरीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित व्याक्तिविरोधात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा काय घडले?

नाशिक रोड : महिलेवर घरी नेऊन गुंगीचे औषध देत बळजबरीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित व्याक्तिविरोधात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा काय घडले?

मॉडेलिंगमध्ये करिअरचे आश्वासन

आफताब मन्नान शेख उर्फ विकी शर्मा (राहणार अडके नगर देवळाली कॅम्प वडनेर गेट) या व्यक्तीने पीडित महिलेने बरोबर ओळख करून संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हळूहळू त्याने पीडित महिलेला मॉडेलिंग मध्ये करिअर करून देतो असे खोटे आश्वासन देऊन तिचा व तिच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन केला. महिला देखील या खोट्या आश्वासनांना बळी पडली.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

व्हिडिओ व्हायरल करण्याती धमकी

त्यानंतर शर्मा याने पीडित महिलेला आपल्या घरी नेऊन गुंगीचे औषध दिले व तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी अत्याचार केला तसेच पीडित महिलेचे आपत्तीजनक व्हिडिओ शूटिंग काढून ते पीडित महिलेच्या नातेवाईक व इंटरनेटवर व्हायरल करण्याचे त्याचप्रमाणे घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देऊन पीडित महिलेला कडून पैसे व सोन्याचे दागिने व मूळ दस्तऐवज बळजबरीने हिसकावून घेतले. सदर घटनेप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शर्मा याच्याविरुद्ध शारीरिक व मानसिक आर्थिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating on a woman by showing the lure of a career in modeling nashik marathi news