Nashik Accident : बसचे नियंत्रण 'कोणत्या' कारणामुळे सुटले याची चौकशी करू - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

"आमचं सरकार येऊन दोन महिने झाले त्यामुळे मागच्या सरकारमध्ये कोणी रंगरंगोटी केली व कोणी टायर बदलले हे पाहू असे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टोला लगावला. 

नाशिक : बसचे नियंत्रण कोणत्या करणमुळे सुटले याची चौकशी करू तसेच एसटी नियम आहे की मृत्यू झाला तर १० लाख आणि गंभीर जखमींना ५ लाख तर  किरकोळ जखमींना १ लाख रुपये देण्याची तरतूद आहे, त्यासाठी लवकरात लवकर कारवाई करू. "आमचं सरकार येऊन दोन महिने झाले त्यामुळे मागच्या सरकारमध्ये कोणी रंगरंगोटी केली व कोणी टायर बदलले हे पाहू असे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टोला लगावला. 

अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन सभागृहात याबाबत आवाज उठवणार - दरेकर

दरम्यान वि पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. अपघातातील मृतांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे असे त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबातील आर्थिक स्थितीची चौकशी करून त्यांना आर्थिक मदत अथवा शासन सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाला कळवावे असे जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निर्देश दिले. परिवहन सेवेचा दर्जा सुधारण्याची गरज असून निकृष्ट रस्त्याच्या कामांमुळे देखील अपघातांची संख्या वाढते. यामुळे अपघाताचे कारणांचा शोध घेऊन सभागृहात याबाबत आवाज उठवणार आहे. तसेच परिवहन मंत्र्यांशी बोलून परिवहन व्यवस्थेला सुधारण्यासाठी प्रयन्त करणार असेही यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले.

Image may contain: 8 people, people smiling, people standing, sky and outdoor

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...
दुर्दैवी अपघात...
नाशिकच्या मेशी येथील धोबीघाट वळणावर मंगळवारी (ता. 28) दुपारी साडेतीनला हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की विहिरीचे कठडे तोडून दोन्ही वाहने थेट विहिरीत पडली. कळवण आगाराची धुळे-कळवण बस (एमएच 06, सी 8422) दुपारी साडेतीनच्या सुमारास धुळ्याहून कळवणकडे येत होती. धोबीघाट वळणावर बसचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस समोरून येत असलेल्या ऍपे रिक्षा (एमएच 15, डीसी 4233)ला धडकली व ऍपे रिक्षासह कठडे तोडून विहिरीत पडली. त्यामुळे घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आहेर, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, पोलिस निरीक्षक सुहास देशमुख, तसेच सटाणा, मालेगाव येथील आपत्ती निवारण दल घटनास्थळी दाखल झाले. या वेळी नागरिकांचीही मोठी गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan Bhujbal on investigation about Nashik Accident marathi News